जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आधीच नियोजन करावे-झावरे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्र सह संपूर्ण देशात थैमान घातले असून तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण देखील या लाटेत वाढले आहे.त्याच बरोबर ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधांची कमतरता भासत आहे.त्यातच कोरोनाची तिसरी लाट कदाचीत लहान मुलांना घातक ठरू शकते,त्यासाठी प्रशासनाने आधीच सज्ज राहावे व लहान मुलांच्या उपचारासाठी जास्तीत जास्त बेड व इतर वैद्यकीय साधनांची उपलब्धता करून लहान मुलांच्या डॉक्टरांची व कोविड योध्यांची बैठक घेऊन लहान मुलांना संसर्गापासून कसे रोखता येईल याचे नियोजन करावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र झावरे यांनी नुकतीच तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन केली आहे.

कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत १८९ नागरिकांचे बळी गेले आहे.आता शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.परिणामस्वरूप रुग्णवाढ रोडावली असून हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.मात्र मृत्युदर अद्याप कमी झालेला नाही हि चिंताजनक बाब असल्याने हे निवेदन शिवसेनेने दिले आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ४८ हजार ०८९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ११ हजार ५७८ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ३३ हजार ५१८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ९९२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.राज्यातील रुग्णवाढ प्रथमच पंचवीस हजारांच्या दरम्यान आली असून कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत १८९ नागरिकांचे बळी गेले आहे.आता शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.परिणामस्वरूप रुग्णवाढ रोडावली असून हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.मात्र मृत्युदर अद्याप कमी झालेला नाही हि चिंताजनक बाब असून या लाटीनंतर तिसरी लाट येऊन धडकणार असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सुतोवाच केले आहे.या पार्श्वभूमीवर झावरे यांनी हे निवेदन दिले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,माजी शहरप्रमुख अस्लम शेख,भरत मोरे,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख ईरफान शेख,उपशहरप्रमुख गगन हाडा,शिवसैनिक अमित भास्कर आदीं मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अस्लम शेख यांनी शहरातील छोट्या व्यापा-यांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी हि विनंती केली.तहसिलदार योगेश चंद्रे यांनी कोपरगाव शिवसेनेच्या जनहितासाठीच्या भावना शासन दरबारी मी पोहचवतो असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close