आरोग्य
पुणतांबा गटात देणार ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन-आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा व मतदार संघातील राहाता तालुक्यातील इतर गावातील कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेतांना अडचणी निर्माण होवू नये यासाठी गरज पडल्यास १० ऑक्सिजन बेडची सुविधा करून देणार असल्याचे आश्वासन देवून पुणतांबा प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच ५ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन देणार असल्याचे सूतोवाच आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.
नगर जिल्ह्यासह देशभरातील पंधरा जिल्हे हे कोरोनाचे प्रभावी केंद्रे ठरली आहे.त्यामुळे आगामी काळ अजूनही कठीण आहे.याला पुणतांबा जिल्हा परिषद गटही अपवाद नाही.याभागात हि मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी आहे.त्यासाठी दिलासा देण्याची गरज आहे.त्यासाठी आ.काळे यांनी हि पुणतांबा भेट दिली आहे.
महाराष्ट्रात रविवारी २९,१७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर २६,६७२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.दुर्दैवाने काल ५९४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे.दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.हि समाधानाची बाब आहे.तरीही नगर जिल्ह्यासह देशभरातील पंधरा जिल्हे हे कोरोनाचे प्रभावी केंद्रे ठरली आहे.त्यामुळे आगामी काळ अजूनही कठीण आहे.याला पुणतांबा जिल्हा परिषद गटही अपवाद नाही.याभागात हि मोठ्या प्रमानावर रुग्ण आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी आहे.त्यासाठी दिलासा देण्याची गरज आहे.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी त्या ठिकाणी नुकतीच भेट दिली त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी सरपंच अॅड. मुरलीधर थोरात,शांतीलाल भाटी,अरुण बाबरे,संजय धनवटे,सचिन धोर्डे,वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन गायकवाड,डॉ. मुर्तडक,ग्रामविकास अधिकारी कडलग आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी बोलताना ते म्हणाले की,”अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांचे मालक व त्यांचे कर्मचारी यांची कोविड तपासणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तपासणीचा वेग वाढवा.कोरोना संसर्ग वाढणार नाही यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घ्यावा.नागरिकांचे प्रबोधन करून बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यासाठी कोरोना समितीच्या सदस्यांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे.नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार घ्यावेत.शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्या व आपल्या कुटुंबाचे आरोग्य आबाधित ठेवावे असे आवाहन केले.