आरोग्य
कोपरगावात रुग्ण वाढ रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर ११ हजार ५५० बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०० हजार ७४६ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १८१ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५७ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ५३ हजार ८१५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख १५ हजार २६० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २१.४६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १० हजार ६२३ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९१.९७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ३५ हजार ९१९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १८ हजार ४७९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख १४ हजार ८४६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ५९३ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
राज्यातील रुग्णवाढ प्रथमच पंचवीस हजारांच्या दरम्यान आली असून कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.परिणामस्वरूप रुग्णवाढ रोडावली असून हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असून कोरोनाने बळी जाणाऱ्यात तरुणाईचा भरणा चिंता निर्माण करणारा आहे.त्यामुळे आगामी काळात प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.