आरोग्य
कोपरगावात बळींची संख्या पुन्हा चार,बाधित संख्या थंडावली
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर ११ हजार १३४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १९ हजार ९७९ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १७२ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ४७ हजार ८३५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०१ लाख ९१ हजार ३४० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २३.१४ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ०९ हजार ९३१ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ८९.७१ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख २३ हजार ८२५ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ३० हजार २२१ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ०१ हजार ३८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ४५८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यात रुग्णसंसख्या रोडावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.ताळेबंदीचा इष्ट परिणाम आता स्पष्ट दिसू लागला आहे.
दरम्यान उद्या दिनांक १८ मे रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोव्हॅक्सिन (covaxin) लसीचा दुसरा डोस वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी तसेच शासकीय कर्मचारी (FLW) यांसाठी ठेवण्यात आला आहे, सदर सत्रामध्ये लस द्यावयाच्या लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय मार्फत फोन करण्यात आला आहे.ज्या लोकांना फोन आला असेल त्यांनीच फक्त जी वेळ दिली असेल त्या वेळेसच आपल्या आधार कार्ड व पहिल्या डोस चे प्रमाणपत्र सह उपस्थित रहावे इतर कोणीही गर्दी करू नये अथवा चौकशीसाठी येऊ नये,जसजशी लस उपलब्ध होईल त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना ( sjs, आत्मा मलिक हॉस्पिटल व ग्रामीण रूग्णालय येथे लस घेतलेले ) लसीकरणासाठी बोलावले जाईल असे आवाहन आरोग्य प्रशासनाने एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.