आरोग्य
अत्यावश्यक सेवा वगळता वाकडी गाव तीन दिवस पूर्णपणे बंद
न्यूजसेवा
वाकडी-(प्रतिनिधी )
कोविड-१९ हि विषानुजन्य साथ दिवसेंदिवस थैमान घालत आहे.वाकडी परिसरात परिस्थिती गंभीर होत चालली आहे.त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. यासाठी शनिवार व रविवार वाकडी गाव पूर्ण पणे बंद ठेवण्याचा निर्णय या आधी घेण्यात आला आहे.आता मात्र सोमवार दि ०३ में ते बुधवार दि ०५ में पर्यंत वाकडी गावातील दवाखाना,मेडिकल, व ठरवून दिलेल्या वेळेत दूध संकलन या अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या वेळेत कोणीही अति महत्वाचे काम व्यतिरिक्त गावात येऊ नये.बाहेर पडू नका,मास्कचा वापर करा.दुध संकलन केंद्र,दवाखाना व मेडिकल मध्ये जाताना मास्क वापरा,सुरक्षित अंतर ठेवा,घाबरू नका,एकमेकांना धीर द्यावा असे आवाहन सरपंच डॉ.संपत शेळके यांनी नुकतेच केले आहे.
“शेतकरी वर्गाने आपल्या शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या मजुरांना मुखपट्या वापरण्यास,सुरक्षित अंतर ठेऊन काम करण्यास,शक्यतो मोजक्या मजुरामध्ये काम करून घेण्यास,प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये लसीकरण साठी जाताना अगोदर नाव नोंदणी करून घेण्यास सांगावे, ज्या वेळेस लसीकरणसाठी नंबर येईल त्याचवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये हजर व्हा इतर वेळी कोणीही गर्दी करू नये”-डॉ.संपत शेळके,सरपंच,वाकडी ग्रामपंचायत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढताना दिसत असून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत.शनिवारी राज्यात तब्बल ६३ हजार २८२ नवीन रुग्णांचे निदान झाले.दिलासादायक म्हणजे शनिवारी ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ३९ लाख ३० हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर नगर जिल्ह्यात अद्याप पर्यंत कोरोनाची लाट ओसरण्याचे नाव घेत नाही.नगर जिल्ह्यात काल अखेर बाधित रुग्ण संख्या ०१ लाख ७५ हजार ०९४ असून त्यातील ०२ हजार ०१३ जणांचे निधन झाले आहे.अनेक रुग्णालयातील भरती रुग्णांना प्राणवायूची उपलब्धता होत नसून कोरोना लसही मिळत नसल्याने त्यांना टाचा घासून मरण्याचा भयावह व अनास्था प्रसंग गुदरत आहे.राहाता तालुकाही त्याला अपवाद नाही.या तालुक्यातही रुग्णवाढ विक्रमी आहे.त्यामुळे आता प्रतिबंधात्मक उपाय योजने क्रंमप्राप्त ठरत आहे.त्यामुळे या पार्श्वभूमीवर सरपंच डॉ.संपत शेळके यांनी हे आवाहन केले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या आवाहनात पुढे म्हटले आहे की,”तसेच सर्व शेतकरी वर्गाने आपल्या शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या मजुरांना मुखपट्या वापरण्यास सांगा.सुरक्षित अंतर ठेऊन काम करण्यास सांगा.शक्यतो मोजक्या मजुरामध्ये काम करून घ्या.प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये लसीकरण साठी जाताना अगोदर नाव नोंदणी करून घ्या ज्या वेळेस लसीकरणसाठी नंबर येईल त्याचवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये हजर व्हा इतर वेळी कोणीही गर्दी करू नये.नोंदणी झाल्यावर ज्या व्यक्तीला संपर्क केला जाईल अशाच व्यक्तींनी आरोग्य केंद्रात उपस्थित रहावे इतरांनी गर्दी करू नये असे कोरोना सुरक्षा समिती कडून सांगण्यात आले आहे. वेळ प्रसंग नाजूक आहे म्हणून खचून जाऊ नका,काळजी घ्या,इतरांना आधार द्या,विनाकारण प्रवास टाळा,घरी रहा, सुरक्षित रहा.कोरोना साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाचे पालन करा.असे आवाहनही कोरोना सुरक्षा समिती अध्यक्ष डॉ.संपत शेळके यांनी शेवटी केले आहे.