जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात ३४ हजार कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण-डॉ.संतोष विधाते

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना नियंत्रणासाठी कोपरगाव तालुक्यात दिनांक २८ एप्रिल पासून ते ०२ मे या कालावधीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कुटुंबाचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून त्यात आतापर्यंत आज अखेर ३४०८६ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले असून १ लाख ६६ हजार ५३२ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.त्यात १०९४ व्यक्ती संशयित आढळून आलेल्या आहेत.त्यापैकी १६७ व्यक्ती कोविड बाधित आलेल्या असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढताना दिसत असून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत.शनिवारी राज्यात तब्बल ६३ हजार २८२ नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे शनिवारी ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ३९ लाख ३० हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर नगर जिल्ह्यात अद्याप पर्यंत कोरोनाची लाट ओसरण्याचे नाव घेत नाही.नगर जिल्ह्यात कालअखेर बाधित रुग्ण संख्या ०१ लाख ७५ हजार ०९४ असून त्यातील ०२ हजार ०१३ जणांचे निधन झाले आहे.कोपरगावातील अधिकृत आकडा लपवला जात आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासन हादरले आहे.वैद्यकीय साधने अपूर्ण पडत आहे.या पार्श्वभुमीवर हे सर्वेक्षण संपन्न होत आहे.

त्याबाबत तालुका वैद्यकीय डॉ.संतोष विधाते यांनी पुढे म्हटले आहे की,”जनतेने सर्वेक्षण करणाऱ्या पथकाद्वारे आरोग्य तपासणी करून शासनाला सहकार्य करावे.सदर सर्वेक्षण पथकात एक आशा स्वयंसेविका,एक अंगणवाडी सेविका,एक जिल्हा परिषद शिक्षक यांचा समावेश करण्यात येत आहे.हे पथक दररोज पन्नास घरांना भेटी देत आहे.भेटी दरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान,ऑक्सिजन पातळी,पल्स रेट तसेच कोविडची इतर लक्षणे तपासत आहे.कविड संबंधी लक्षणे आढळल्यास सदर रुग्णांना कोविड टेस्ट करण्यासाठी शासकीय दवाखान्यात संदर्भित करून त्यांची कोविड तपासणी करण्यात येतआहे.सदर मोहिमेत नागरिकांनी जनहितार्थ सहकार्य करावे सारे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.संतोष विधाते यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close