आरोग्य
कोपरगावातील रुग्णांना उपचारासाठी बाहेर पाठवू नका-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्व खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावे.नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास आपण बांधील असून बाधित रुग्णांना उपचारासाठी बाहेर पाठवू नका असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांना नुकतेच केले आहे.
“कोरोनाची दुसरी लाट धक्कादायक असून कोरोना बाधित रुग्णांची वाढलेली संखेमुळे आरोग्यसेवेवरील मोठा ताण वाढला आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीत सरकारी रूग्णालयाप्रमाणेच खाजगी डॉक्टर देखील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे आले हि अतिशय समाधानाची बाब आहे”-आ.आशुतोष काळे.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना परिस्थिती दर दिवसागणिक चिंतेच्या वळणावर पोहोचत असतानाच आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सध्या नागरिकांना या परिस्थिती शक्य त्या सर्व परिंनी आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता दर दिवशी महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं रुग्णालयांतील सुविधा,रुग्णांसाठीचे बेड्स,औषधांची उपलब्धता यांच्याबाबत विचारणा केली जात आहे.त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही कोपरगाव तालुक्यातील अनेक रुग्ण नाशिक,मुंबई आदी महानगरात आजच्या असून तेथे उपचाराचा खर्च मोठा असल्याने अनेकांना आपला खिसा खाली करावा लागतो या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात सुरु करण्यात आलेल्या सर्व खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांची रविवार (दि.११) रोजी साईबाबा तपोभूमी कोपरगाव येथे बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे.
सदर प्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते,डॉ.दत्तात्रय मुळे,डॉ.अमोल अजमेरे,डॉ.योगेश कोठारी,डॉ.राजेश माळी,डॉ.मयूर तिरमखे,डॉ.संकेत माळी,संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे सेक्रेटरी प्रसाद कातकडे,आत्मा मलिक हॉस्पिटलचे शरद अनारसे,अभिमन्यू सूर्यवंशी,श्रीमती कांचन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”अचानकपणे कोरोना बाधित रुग्णांची वाढलेली संख्या त्यामुळे आरोग्यसेवेवरील ताण प्रचंड वाढला आहे.अशा परिस्थितीत सरकारी रूग्णालयाप्रमाणेच खाजगी डॉक्टर देखील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे आले हि अतिशय समाधानाची बाब आहे.आजच्या नाजूक परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांसाठी डॉक्टर हेच एकमेव आशेचा किरण आहे.अशा कठीण परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपण घेत असलेले कष्ट करीत असलेली तळमळ पाहून डॉक्टरांच्या रुपात देव उपचार करीत आहे.आरोग्य विभाग व प्रशासन आपल्या परीने योग्यप्रकारे त्यांचे कर्तव्य बजावत आहे.आरोग्य विभागाच्या मागणीनुसार आवश्यक त्या सोयी सुविधा देखील वेळेत उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्याजोडीला आपण सर्वांनी सेवाभावी वृत्ती जोपासून आपल्यातील देवाच्या रूपातून कोरोना बाधित रुग्णांना आपल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची विनंती यावेळी त्यांनी सर्व खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांना केली आहे.