आरोग्य
कोपरगावात कोरोना सुरक्षा समिती स्थापन करणार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासन हादरले असून आता वाढणारे रुग्ण व त्यावर उपचार करण्यासाठी शहरात टाळेबंदीसह खाटा वाढविल्या जात असताना कोपरगाव नगरपरिषदेने आपल्या कार्यक्षेत्रात आता “कोरोना सुरक्षा समित्या”स्थापन करण्याचा अनिर्णय घेतला असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“कोपरगाव शहरात कोरोना विषाणूची दुसरी लाट आलेली असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.मृत्युचेही प्रमाण वाढले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणेकामी प्रभाग निहाय “कोरोना सुरक्षा समिती” स्थापन करावयाची असून प्रत्येक प्रभागातील दोन नगरसेवक व त्याच प्रभागातील चार नागरिक यांची समिती स्थापन होणार आहे”-नगराध्यक्ष विजय वहाडणे कोपरगाव नगरपरिषद.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.राज्यात आज ५८ हजार ९९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज नवीन ४५ हजार ३९१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात आतापर्यंत एकूण २६ लाख ९५ हजार १४८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण ५ लाख ३४ हजार ६०३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.९६ झाले आहे. काल ५६ हजार २८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.कोपगाव तालुक्यात काळ १६१ रुग्ण बाधित आढळले आहेत.
त्यामुळे तालुका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा उंचावता आलेख पाहता या पार्श्वभूमीवर येत्या काळात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय़ प्रशासन घेणार का ? यासंदर्भातील धाकधूकही अनेकांनाच लागली आहे.त्यामुळं शनिवार या सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.कोपरगावाठी रुग्णवाढीने कहर झाला आहे.
कोपरगाव शहरात कोरोना विषाणूची दुसरी लाट आलेली असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.मृत्युचेही प्रमाण वाढले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणेकामी प्रभाग निहाय “कोरोना सुरक्षा समिती” स्थापन करावयाची आहे.प्रत्येक प्रभागातील दोन नगरसेवक व त्याच प्रभागातील चार नागरिक यांची समिती स्थापन होणार आहे.ज्या नागरिकांना स्वतःहून या समितीत काम करायचे आहे त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली नांवे नगरसेवकांच्या माध्यमातून दि.१२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सुनील गोर्डे,उपमुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद यांचेकडे द्यावीत.
आपापल्या प्रभागातील कोरोना बाधित रुग्णांची नांवे रुग्णांना उपचारासाठी भरती केलेले ठिकाण (दवाखाना,कोविड सेंटर) त्यांचे संपर्कात येणाऱ्यांची माहिती कोरोना संबंधित लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींची नावे इ.माहिती कार्यालयात कळविणे ही जबाबदारी पार पाडायची आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावयाची आहे.संपूर्ण शासकिय यंत्रणा,अधिकारी-कर्मचारी यांना सहकार्य करणे हे जागरूक नागरिक म्हणून गरजेचे आहे.तरी इच्छुकांनी या बाबत नगरपरिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.