जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात…या व्यापाऱ्यांचे दुकाने सुरु करण्यासाठी आंदोलन !

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरासह राज्यात छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने बंद केल्याचे पडसाद आज उमटले असून कोपरगाव व्यापारी महासंघ व कोपरगाव व्यापारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज छोट्या व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करण्यासाठी सरकारने दिलासा द्यावा या मागणीसाठी आज महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या दुकानासमोर उभे राहून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून समोर निषेध फलकासह दुकाने सुरु करण्याच्या मागणीचे आंदोलन केले आहे.

“महाराष्ट्र शासनाने दिनांक ४ एप्रिल २०२१ नुसार “ब्रेक द चेन” मिशन अंतर्गत तीन दिवसापूर्वी टाळेबंदी सुरु केली आहे.याचा पहिला दणका छोटे टायर पंचर दुकान चालक,मोबाईल विक्रेते,इलेकट्रॉनिक्स,इलेक्ट्रिक,बॅटरी,स्पेअर पार्ट,नाभिक,सुवर्णकार,चर्मकार,हॉटेल,गॅरेज चालक,झेरॉक्स व विविध उत्सवानिमित्त काही छोट्या चीजवस्तू बनवणाऱ्या ग्रामीण कारागिरांना व तत्सम व्यापाऱ्यांना बसला आहे.त्यामुळे त्यांची रोजी-रोटी हिसकावली गेली आहे.त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे”.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.व्यापारी आणि सामान्य नागरिकांवर मोठे निर्बंध आल्याने राज्य सरकारला त्यांच्या असंतोषाला सामोरे जावं लागते आहे.अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षा-टॅक्सी-बस प्रवासाला सरकारने मुभा दिली आहे.मात्र, ही मुभा देताना पंक्चर काढणारी गॅरेज आणि गाड्यांचे सुटे भाग विकणारी दुकाने,झेरॉक्स आदी दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत.त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे “आम्ही सर्व नियम पाळू मात्र व्यापार करण्यास परवानगी मिळावी”,अशी मागणी कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी सर्व प्रथम केली होती त्या नंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते.त्यांनी केलेल्या मागणीत छोट्या व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळावी हि प्रमुख मागणी केली होती.त्याचे पडसाद आज कोपरगावात उमटले पुन्हा उमटले असून छोट्या व्यापाऱ्यांनी व्यापारी महासंघ व व्यापारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली आज दुकाने सुरु करण्याची मागणी करण्यासाठी आपल्या दुकासमोर फलक धरून शासनाचा निषेध व्यक्त करत आपली दुकाने सुरु करण्याची मागणी केली आहे.

सदर प्रसंगी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,सचिव प्रदीप साखरे,राजेंद्र बंब,चांगदेव शिरोडे,अकबरभाई शेख,आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.

कोपरगाव शहरात व तालुक्यात्साह दिवसात दहा नागरिकांचे बळी गेल्याने कोरोनाचा वाढणारा विक्रम थांबत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.त्यामुळे राज्य सरकारसह कोपरगाव तालुका प्रशासन हादरले आहे.त्यामुळे या साथीला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत.हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लावणे बाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक ४ एप्रिल २०२१ नुसार “ब्रेक द चेन” मिशन अंतर्गत दिनांक ५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ या दरम्यान जमावबंदी लागु केला आहे.या दरम्यान ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येवू शकणार नाहीत याची खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.त्याची तीन दिवसापूर्वी सुरु केली आहे.याचा पहिला दणका छोटे टायर पंचर दुकान चालक,मोबाईल विक्रेते,इलेकट्रॉनिक्स,इलेक्ट्रिक,बॅटरी,स्पेअर पार्ट,नाभिक,सुवर्णकार,चर्मकार,हॉटेल,गॅरेज चालक,झेरॉक्स व विविध उत्सवानिमित्त काही छोट्या चीजवस्तू बनवणाऱ्या ग्रामीण कारागिरांना व तत्सम व्यापाऱ्यांना बसला आहे.त्यामुळे त्यांची रोजी-रोटी हिसकावली गेली आहे.त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close