जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात एकीकडे रुग्ण वाढ,तर दुसरीकडे रुग्णांची लूट सुरु

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरंगाव तालुक्यातुन नगरला तपासणी साठी ८५ श्राव पाठवले असून तेथून तपासून आलेल्या अहवालात ३१ बाधित रुग्ण आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात २१ तर एकूण रॅपिड टेस्ट २३९ रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्या मधून ६९ असे एकूण १२१ रुग्ण बाधित आढळल्याने कोरोनाचा वाढणारा विक्रम थांबत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.आज उपचारानंतर ६४ रुग्णांना सोडून देण्यात आले आहे.असल्याने कोपरगाव शहर पुन्हा एकदा उचांकी रुग्णवाढ होत आहे.प्रशासनाला रुग्ण वाढीला आळा घालण्यात अपयश येत असून शहर व तालुक्यात टाळेबंदी सुरु झाली असून शहरात आता अत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने दोन दिवसापूर्वी कडक अमलबजावणी सुरु झाली आहे.मात्र वैद्यकीय क्षेत्र मात्र रुग्णांची प्रचंड लूट करीत असून यावर कोणाचेही नियंत्रण दिसत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०५ हजार ७३७ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ७१३ असून आज पर्यंत ६४ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२० टक्के आहे.तर एकूण २५ हजार ३८५ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ०१ लाख ०१ हजार ५४० असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा २०.९५ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०४ हजार ५२२ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८५.०५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आता आ.काळे हे घरोघरी प्रतिबंधात्मक औषधें वाटप करताना दिसत आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ०५ हजार ९२८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १८ हजार ६०९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ८६ हजार ०६४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार २५४ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव तालुक्यात सहा दिवसात १२ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.कोपरगाव शहर पुरुष एकूण ३९ रुग्ण असून त्यात वय-१९,४०,३८,३६,२९,७४,३२,२७,महिला वय-६०,६३,विवेकानंद नगर महिला वय-४९,साई सिटी पुरुष वय-३५,५६,३९,महिला वय-२९,रेल्वे स्टेशन रोड पुरुष वय-३९,कोर्ट रोड पृष्ठ वय-२८,महिला वय-२३,गोकुळनगरी महिला वय-६५,लक्ष्मीनगर महिला वय-४९,सराफ बाजार महिला वय-२१,गवारे नगर महिला वय-२५,भगवती कॉलनी पुरुष वय-४३,सम्यकनगर पुरुष वय-३२,समतानगर पुरुष वय-१७,महिला वय-३०,संजयनगर महिला वय-२८,अंबिकानगर पुरुष वय-२८,टिळेकर वस्ती पुरुष वय-४६,बँक कॉलनी पुरुष वय-३९,गजानननगर पुरुष वय-३२,५७,महिला वय -२५,गुरुद्वाराजवळ महिला वय-३५,गोदाम गल्ली पुरुष वय-८७,लक्ष्मी नगर पुरुष वय-४३,सातभाई चाळ पुरुष वय-५०,शिवाजीनगर पुरुष वय-३०,वडांगळे वस्ती पुरुष वय-७४,आदींचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यात आज आलेल्या एकूण-८२ बाधित रुग्णांत पुढील प्रमाणे-संजीवनी पुरुष वय-१२,२३,५१,महिला वय-२०,खिर्डी गणेश पुरुष वय-२४,४०,महिला वय-७०,कोळपेवाडी पुरुष वय-४२,धारणगाव पुरुष वय-३८,महिला वय-७५,कोकमठाण पुरुष वय-५२,५८,सुरेगाव पुरुष वय-६०,टाकळी पुरुष वय-३६,४३,४५,२६,५४,३५,५०,२८,महिला वय-२५,५८,२५,ब्राम्हणगाव पुरुष वय-२१,२१,१५,५०,५०,महिला वय-१८,१७,४५,४३,सोनारी पुरुष वय-५६,५६,महिला वय-४५,दहिगाव पुरुष वय-३०,महिला वय-४०,५०,पढेगाव पुरुष वय-३१,१७,महिला वय-२८,४१,संवत्सर पुरुष वय-३५,२३,४५,४७,महिला वय-५०,४५,४८,२३,भोजडे पुरुष वय-४०,४५,१५,दशरथवाडी महिला वय-२०,वारी पुरुष वय-२५,३०,२६,महिला वय-५२,कान्हेगाव पुरुष वय-३३,२७,३३,कोळगाव पुरुष वय-३४,सुरेगाव पुरुष वय-४२,मंजूर पुरुष वय-५९,चासनळी महिला वय-६३,कारवाडी महिला वय-२६,उक्कडगाव पुरुष वय-३६, महिला वय-३२,करंजी महिला वय-२४,वेळापूर महिला वय-१२,जेऊर कुंभारी पुरुष वय-५६,२२,४१,शिंगणापूर पुरुष वय-३२,महिला वय-४१,मळेगाव थडी पुरुष वय-३२,सोनेवाडी पुरुष वय-५५,महिला वय-५२,येसगाव पुरुष वय-२५,पोहेगाव महिला वय-२५,मुर्शतपुर महिला वय-२६,आदींचा समावेश आहे.

आता कोरोना उचांकी पातळीवर पोहचला असून दरम्यान आता वैद्यकीय क्षेत्रांने,रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची लूटमार सुरु केली आहे.त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून बिल तपासणी पथके फक्त शोभेचे बाहुले ठरले आहे.त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.याबाबत लोकप्रतिनिधींनी व वैद्यकीय क्षेत्र व कार्यकर्ते नागरिक यांची एकत्र बैठक घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close