नगर जिल्हा
वाकडी-श्रीरामपुर रस्ता बनला मृत्युचा सापळा !

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील वाकड़ी मार्गे जाणाऱ्या शिर्डी-शिंगणापुर या तीर्थ क्षेत्राना जोडणाऱ्या गणेशनगर ते श्रीरामपुर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून हा रास्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.
वाकड़ी मार्गे गणेशनगर ते श्रीरामपुर हा सुमारे तेरा कि.मी. अंतरावरील रस्ता हा इतर जिल्हा मार्ग मधून प्रमुख जिल्हा मार्ग मधे समाविष्ठ करण्यासाठी मार्च महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांच्याकड़े आ.राधाकृष्ण विखे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद अहमदनगर यांचे कडून पत्रव्यवहार केला आहे. तो प्रस्ताव मंजूर होताच या रस्त्याकरीता वरिष्ठ पातळीवर मोठा निधि उपलब्ध होऊन या रस्त्याचे काम देखील मजबूत होईल तसेच आता पावसाने या रस्त्याची पूर्ण चाळण झाली असून रस्ता दुरुस्तिची मागणी केली आहे-कविता लहारे, जि. प.सदस्या.
शनी शिंगणापूर या तीर्थक्षेत्राला अत्यंत जवळचा ठरणारा शिर्डी-शिंगणापुर हा मार्ग साई भक्त व ग्रामस्थांना सर्वात जवळचा ठरत आहे.या मार्गासाठी साई संस्थानने अध्यक्ष व श्रीरामपूरचे कै.आ.जयंत ससाणे यांच्या काळात या रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येऊन हा मार्ग दुहेरी करण्यात आला होता.मात्र त्यानंतर या मार्गाकडे आता सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे.वर्तमानात हा रस्ता जाणाऱ्या व इतर महत्वाची वाहतूक या भागातुंन होत असताना या वाकड़ी मार्गे रस्त्याची गणेशनगर ते श्रीरामपुर येथील दत्तनगर फाट्यापर्यंत अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.हा मार्ग अक्षरशः मृत्युचा सापळा बनला आहे.या रस्त्याला आधीच योग्य पाण्याचा निचरा होण्यास गटारीं नाही.त्यात नुकत्याच सुरु झालेल्या पावसाने व मध्यतरीच्या परतीच्या पावसाने हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे.या रस्त्यावरील काही भागात असलेले खड्डे पावसात भरले असताना रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने या भागातुंन ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना रस्त्यावरील खड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे.या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाकड़ी मार्गे जाणाऱ्या बहुतेक वाहन चालकांनी आपला मार्ग बदलला असून हि वाहनाविना वाकड़ी-गणेशनगर-एकरुखे या मार्गावरील बाजार पेठेमधील गर्दी मंदावली आहे
गणेशनगर ते धनगरवाड़ी फाटा हा सुमारे आठ कि.मी. चा रस्ता राहाता तालुक्यात असुन कित्तेक वर्षापासून हा रस्ता जिल्हापरिषदेकड़े आहे तसेच धनगरवाड़ी फाटा (एम.आय.डी.सी.) पासून ही हद्द श्रीरामपुर तालूका यांच्या कार्यक्षेत्रात आहे.गणेशनगर ते वाकड़ी येथील गोदावरी कालवा पुलापर्यंत अनेक वर्षपासून जिल्हा परिषदे मार्फ़त डागडुजी व दुरुस्ती होत आहे.तसेच धनगरवाड़ी फाटा (एम.आय.डी.सी.) येथून ते दत्तनगर फाटा असा सुमारे सात कि.मी. परिसरातील रस्त्यावर सात वर्षापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मजबूतिकरण डाम्बरीकरण करण्यात आले होते.आता मात्र या भागातील रस्ता अतिशय निकृष्ठ व खडडेमय झाला आहे.वाकड़ी मार्गे राहाता व शिर्डी शिंगणापुर असा मध्यममार्ग असताना या रस्त्याकड़े आजवर वरिष्ठ लोकप्रतिनिधि दुर्लक्ष करत आहे.दत्तनगर येथील वाकड़ी फाटा ते वाकड़ी गणेशनगर पर्यंत हा रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला आहे.या भागातुन दुचाकी चालविणे सुद्धा कठिण झाले आहे. शाळेत पायी जाणाऱ्या शाळकरी मुलांना या रस्त्यावरील खड्डे व खड्डे चुकविणाऱ्या वाहनामुळे त्रास होत आहे. या भागातील बहुतेक खड्डे इतके भयावह आहे की दुचाकी सह चारचाकी वाहनास खड्डा हुकविताना मोठी यातायात करावी लागते. त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितिमधे छोटे मोठे अपघात होत आहे.वाहन चालकांत वादविवाद निर्माण होत आहे.वाकड़ी गांव हे राहाता तालुक्यात असून मतदार संघ कोपरगाव आहे.तरी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी वाकड़ी ग्रामस्थ,व प्रवाशी वर्गातून होत आहे.