आरोग्य
कर्मवीर काळे मित्र मंडळाचे वतीने नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधक औषधे

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कोरोना संकटाचा वाढता धोका लक्षात घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाला आ. आशुतोष काळे व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने मोफत सॅनिटायझर देणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणिय रित्या वाढ होत आहे.त्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील नागरिकांचे कोरोना पासून बचाव करण्यासाठी खाजगी रुग्णालयात मोफत कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.त्याचबरोबर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येक कुटुंबाला मोफत सॅनिटायझर देण्याचा निर्णय कर्मवीर काळे मित्रमंडळाने घेतला आहे”-आ.आशुतोष काळे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण राज्यात गेल्या २४ तासात तब्बल ५७ हजार ०७४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळं २२२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २७,५०८ रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे.त्याला कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अपवाद नाही कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याने आता रोजगाराचा व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणिय रित्या वाढ होत आहे.त्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील नागरिकांचे कोरोना पासून बचाव करण्यासाठी खाजगी रुग्णालयात मोफत कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येक कुटुंबाला मोफत सॅनिटायझर देण्याचा आ. काळे यांनी निर्णय घेतला आहे.मागील वर्षी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मतदार संघातील नागरिकांना त्यांनी मोफत आरोग्यसेवा,दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रेशनवर मोफत धान्य वाटप तसेच आरोग्य विभाग व प्रशासनाला विविध माध्यमातून सर्वतोपरी मदत केली आहे.मागील काही महिन्यापूर्वी कोरोना संकटावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळविले होते.मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे रोजच शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे.वाढत्या कोरोना संसर्गाला आळा बसावा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक कुटुंबांला त्यांच्या घरपोच सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.