आरोग्य
…तर स्मशानभूमी अंत्यसंस्काराला कमी पडेल-कोपरगावात या पदाधिकाऱ्यांचा इशारा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी आपल्या संचार स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले व मुखपट्या सक्तीने लावल्या तरच ही साथ नियंत्रणात येईल अन्यथा स्मशान भूमीत अंत्यसंस्काराला जागा शिल्लक राहाणार नाही असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये बेताल नागरिकांना दिला आहे.
“काल तर रुग्णसंख्या १४६ पर्यंत जाऊन मृत्यू संख्या ६ झाली.याच वेगाने प्रादुर्भाव वाढत गेल्यास आरोग्य व्यवस्थाही कमी पडणार आहे.अंत्यसंस्कार करायला नातेवाईकही धजावत नसतांना कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी हे जोखमीचे काम करत आहेत.तहसील,पोलीस,आरोग्य या सर्व यंत्रणा रात्रंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू यासाठी प्रयत्न करत आहेत”-विजय वहाडणे,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगावात काल एकाच दिवशी १४६ अशी विक्रमी रुग्णवाढ झाली व एकाच दिवशी सहा रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले त्यामुळे शहर व तालुक्यात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.व दुसरीकडे व्यावसायिक व रोजंदारीवर आपले प्रपंच चालविणाऱ्या नागरिकांना टाळेबंदीची भीती सतावत आहे.गत वर्षी तालुका प्रशासनाने सक्तीने कारवाई केल्याने कोरोना साथ नियंत्रणात राहिली होती मात्र या वेळी मात्र उलटी स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे हे संकट आणखी गडद होत चालले आहे.या पार्श्वभूमीवर हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”मागील वर्षी कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता अहमदनगर जिल्ह्यात सर्वात कमी कोरोना रुग्ण कोपरगावात होते.त्यावेळी कोरोना नियंत्रणात रहावा,प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महसुल प्रशासन,कोपरगाव नगरपरिषद,पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून आपण शासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केलीच होती पण आपण स्थानिक पातळीवरही काही निर्णय घेऊन राबविले होते.आठवड्यातून एक दिवस पूर्ण टाळेबंदी,दैनंदिन व्यवहाराच्या वेळाही आपण कमी केल्या होत्या.परिणामस्वरूप कोरोना नियंत्रित झाल्याने रुग्णासंख्या आटोक्यात राहिली.
आज मात्र कोरोनाचा धोका वाढलेला दिसतो. काल तर रुग्णसंख्या १४६ पर्यंत जाऊन मृत्यू संख्या ६ झाली.याच वेगाने प्रादुर्भाव वाढत गेल्यास आरोग्य व्यवस्थाही कमी पडणार आहे.अंत्यसंस्कार करायला नातेवाईकही धजावत नसतांना कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी हे जोखमीचे काम करत आहेत.तहसील,पोलीस,आरोग्य या सर्व यंत्रणा रात्रंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू यासाठी प्रयत्न करत आहेत.पण अजूनही काही बेजबाबदार नागरिक मास्क वापरत नाहीत,काही अस्थापनात प्रचंड गर्दी होत असल्याने रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.मागील वर्षी स्थानिक पातळीवर काही निर्णय घेतल्यावर “गोरगरिबांचे पत्रकबाज कैवारी” जास्तच तयार झाले असल्याचा आरोप करून “गरिबांना किराणा देणार का-रेशन देणार का ? असे प्रश्न सामाजिक संकेत स्थळावर विचारले जायला लागले.कोरोना विरुद्धच्या लढयात कुठलेही योगदान न देता केवळ टिका टिपणी झाल्याने,यावेळी यंत्रणेतील कुणीही जोखीम घेऊन निर्णय घ्यायला तयार नाही”असे सांगून प्रशासनाची पाठराखण केली आहे.
नागरिकांनी मुखपट्या व प्रतिबंधात्मक औषधांचा वापर,स्वच्छता,सुरक्षित अंतर याची अंमलबजावणी स्वतःच प्रामाणिकपणे करावी.तरच भयावह कोरोना रोखता येईल.आज जिल्ह्यात कोपरगावची रुग्णसंख्या दोन नंबरची आहे.कोपरगावकर आता जर सावध झाले नाही तर कोविड केंद्रे,हॉस्पिटल,अमरधामही कमी पडण्याचा मोठाच धोका असल्याने शासकिय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन करून कुठलेही सामाजिक कार्य न करता”कोरोनाबाबत” केवळ टीका टिपणी करणाऱ्या प्रवृत्तीवर शासनाने योग्य कारवाई केली पाहिजे अशी अवास्तव मागणी केली आहे.ज्यांना काही सूचना-बदल सुचवायचे असल्यास अधिकृत शासकिय यंत्रणेशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.व संचारबंदीत फिरण्यास नागरिकांना वितोध केला आहे.अन्यथा प्रशासनाला टाकेबंदीचा अनिच्छेने निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे.
काही नागरिकांच्या गलथानपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाऊन रुग्णालयात खाटा उपलब्ध झाल्या नाहीतर शासकिय यंत्रणेला दोष देण्यात काही अर्थ नाही.म्हणून वेळेतच सावध होऊन प्रत्येकाने कोरोना रोखण्याच्या कामात योगदान द्यावे असे आव्हान अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.