आरोग्य
कोपरगाव तालुक्यात मोठी रुग्णवाढ,आळा घालण्यात प्रशासनाला पुन्हा अपयश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०४ हजार ३५० इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ५३३ असून आज पर्यंत ५२ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२० टक्के आहे.तर एकूण २४ हजार २१२ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९६ हजार ८४८ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १७.९७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ७६६ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८६.५७ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८८ हजार ८५६ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०६ हजार ०२७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ८१ हजार ६४० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १८८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-८६ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरातील रुग्ण पुढीलप्रमाणे कोपरगाव शहर पुरुष वय-१५,४५,५१,१८,१६,६२,५४,२३,०५,३८ महिला वय-३७,१३,३६,३८,२७,समतानगर पुरुष वय-५२,गौरवनगर पूरुष वय-२३,महिला वय-४०,येवला रोड पुरुष वय-४५,७१,महिला वय-६६,५८,सुखशांतीनगर पुरुष वय-६५,महिला वय-५८,ब्राम्हण गल्ली महिला वय-६०,साईनगर महिला वय-६५,४०,कापड बाजार महिला वय-४०,१०,गौतम गल्ली पुरुष वय-४०,१९,१८,४३,६५,महिला वय-४०,११.इंदिरा पथ पुरुष वय-३३,महिला वय-६०,सप्तश्री मळा पुरुष वय-७२,गांधी चौक पुरुष वय-३६,बेत कोपरगाव पुरुष वय-४३,वाणी सोसायटी महिला वय-४८,१९,सराफ बाजार पुरुष वय-४५,महिला वय-४५,बँक रोड पुरुष वय-१९,महिला वय-६७,१६,धारणगाव रोड पुरुष वय-७०,महिला वय-५५,७८,शिवाजी रोड महिला वय-५३,महादेव गल्ली पुरुष वय-५७,लोढा मंगल कार्यालय पुरुष वय-४२,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील बाधित रुग्ण पुढील प्रमाणे-कोकमठाण पुरुष वय-६३,३५,चांदेकसारे पुरुष वय-४८,धारणगाव पुरुष वय-४९,करंजी पुरुष वय-४९,कोळपेवाडी पुरुष वय-२१,३२,३६,महिला वय-३८,जेऊर कुंभारी पुरुष वय-७०,कान्हेगाव पुरुष वय-४७, वारी पुरुष वय-३१,शिंगणापूर पुरुष वय-४३,५३,महिला वय-७६,४५,ब्राम्हणगाव पुरुष वय-३२,संवत्सर पुरुष वय-२२, महिला वय-६५,जेऊर पाटोदा पुरुष वय-६६,साखरवाडी पुरुष वय-३८,मुर्शतपुर पुरुष वय-६७,०८,महिला वय-६३,१४,३३,पढेगाव महिला वय-४४,चासनळी पुरुष वय-६६,धामोरी पुरुष वय-५५,सोनेवाडी पुरुष वय-५१,महिला वय-८०,आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असून गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.मात्र उत्तोरोत्तर रुग्णवाढीचा आळा घालण्यात अपयश येत आहे.त्यामुळे तालुक्यात नागरिकांत चिंता वाढली आहे.