जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

इंधन दरवढीबाबत कोपरगावात कॉंग्रेसचे आंदोलन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी.तसेच केंद्र सरकारने शेतकरी,कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे कोपरगांव काँग्रेसचे वतीने याबाबतचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले आहे.

कोरोना काळात देशावर इंधन दरवाढीचं संकट गडद होत चालंलं आहे.कोरोना व्हायरसमुळे देशात अनेक शहरात व जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.अशातच अनलॉक-१ नंतरही अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे.देशात पेट्रोल-डिझेल दर वाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.

कोरोना काळात देशावर इंधन दरवाढीचं संकट गडद होत चालंलं आहे.कोरोना व्हायरसमुळे देशात अनेक शहरात व जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.अशातच अनलॉक-१ नंतरही अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे.देशात पेट्रोल-डिझेल दर वाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.देशभरात विविध ठिकाणी आज काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत.

मुंबईत प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले तसेच काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात,आ.डॉ.सुधीर तांबे,आ.लहू कानडे यांच्यासह काँग्रेस नेते,पदाधिकाऱ्यांनी भारत बंदला ठीकठिकाणी निवेदने भारत बंदला पाठिंबा देण्यात आला आहे.

कोपरगांव तहसिल मध्ये आज निवेदन दिले त्यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,सेवा दलाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भगत,उपाध्यक्ष विष्णू पाडेकर,विजयराव जाधव,महिला तालुका अध्यक्ष अडॅ .शितल देखमुख,रौनक अजमेरे,चंद्रहार जगताप आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close