आरोग्य
दुकानदार.ग्राहकांनी मुखपट्टी न वापरल्यास दुकान करणार बंद-जिल्हाधिकारी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव,राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत असल्याची गंभीर दखल नगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी घेतली असून या ठिकाणी असलेले व्यापारी,दुकानदार यांनी व त्यांच्या दुकानात आलेल्या ग्राहकांनी कोरोना रोखण्यासाठी तोंडावर मुखपट्टी न बांधल्यास त्यांची दुकाने बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून या पुढील काळात धुलिवंदन,यात्रा,रंगपंचमी आदी उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
“जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले आहे.व आगामी काळात रुग्ण वाढण्याची शक्यता गृहीत धरून हा वाढीव संसर्ग रोखण्याचे काम करावे लागणार त्यामुळे आगामी काळातील धुलिवंदन,यात्रा,रंगपंचमी आदी उत्सव एकत्र येऊन मोकळ्या जागेत,हॉटेल,रिसॉर्ट,सार्वजनिक सभागृहे,सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा,सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा आदी ठिकाणी दि.२८ मार्च पासून ते ०४ एप्रिल पर्यंत साध्या पद्धतीने साजरे करावे”-डॉ.राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी,नगर जिल्हा.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८६ हजार ०८६ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ८७४ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ८० हजार ०२३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १८८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव शहर व तालुक्यात काल आलेल्या एकूण-९४ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.त्यामुळे त्यांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या यादेशात पुढे म्हटले आहे की,”जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले आहे.व आगामी काळात रुग्ण वाढण्याची शक्यता गृहीत धरून हा वाढीव संसर्ग रोखण्याचे काम करावे लागणार त्यामुळे आगामी काळातील धुलिवंदन,यात्रा,रंगपंचमी आदी उत्सव एकत्र येऊन मोकळ्या जागेत,हॉटेल,रिसॉर्ट,सार्वजनिक सभागृहे,सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा,सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा आदी ठिकाणी दि.२८ मार्च पासून ते ०४ एप्रिल पर्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.यात कोणां संस्थेने.व्यक्तीने,संघटनेने या देशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०)च्या कलम १८८ नुसार दंडनीय कारवाईस पात्र राहील असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी शेवटी दिला आहे.