आरोग्य
कोपरगाव तालुक्यात रुग्णवाढ थांबेना,नवीन नियम लागू
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ३९६ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या २३६ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.४४ टक्के आहे.तर एकूण २२ हजार १८१ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८८ हजार ७२४ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १५.३१ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार १११ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ९१.६१ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-२३ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण-१३ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.सिद्धिविनायक कॉलनी पुरुष वय-३०,दोन महिला वय-२६,३२,लक्ष्मीनगर पुरुष वय-३०,४७,महिला वय-१९,संभाजी चौक पुरुष वय-२३,खडकी महिला वय-६८,साई नगर महिला वय-१२,बोरावके चाळ महिला वय-१५,शारदा नगर महिला वय-४७,सराफ बाजार -पुरुष वय-१९,सुभाषनगर पुरुष वय-४७,आदींचा समावेश आहे.
तर तालुका हद्दीतील १० रुग्ण पुढील प्रमाणे कान्हेगाव महिला वय-१० ,टाकली पुरुष वय-२६,महिला वय-२२,जेऊर कुंभारी महिला वय-६४,५८ तर शिंगणापूर पुरुष वय-४०,६०,महिला वय-२६,संवत्सर महिला वय-३६,मढी दोन महिला वय-२५,३५,आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे आज नवीन नियम जाहीर केले आहे.त्यामुळे नागरिकांना आता लग्न कार्य,दहावे,तेरावे,वाढदिवस आदी कार्यक्रम टाळावे लागणार आहे.