आरोग्य
कोपरगावात कोरोना प्रतिबंधात्मक औषधें वाटपास प्रारंभ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून याला प्रतिबंधित करण्यासाठी विविध उपाय योजना सुरु असून कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधत आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेचे कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी प्रत्येक कुटुंबाला प्रतिबंधात्मक औषधे (सॅनिटायझर) देण्याचा निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी सुरु केली आहे.
“मागील मार्च महिन्यापासून कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढत आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघात दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे.विदेशाच्या वेशीवरून जीवघेणा कोरोना विषाणू आज गावागावातील कुटुंबाच्या दारापर्यंत येवून पोहोचला आहे.या कोरोना संकटापासून जनतेचा बचाव व्हावा यातूंन का कार्यक्रम सुरु केला आहे”-आ.आशुतोष काळे
महाराष्ट्रात कोरोनाने गंभीर रुप धारण केलं आहे.कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.कोरोनाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होणे गरजेचं आहे.अशात आज राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे.तर दुसरीकडे लसींच्या पुरवठ्या संदर्भात केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.त्यामुळे राज्यात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी या उपाययोजना सुरु केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील मार्च महिन्यापासून कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढत आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघात दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे.विदेशाच्या वेशीवरून जीवघेणा कोरोना विषाणू आज गावागावातील कुटुंबाच्या दारापर्यंत येवून पोहोचला आहे.या कोरोना संकटापासून जनतेचा बचाव व्हावा या उद्देशातून त्यांनी जनतेच्या दारी जावून नागरिकांना सॅनिटायझर तर वाटप केलेच त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रत्येक कुटुंबाची आपुलकीने चौकशी करून घाबरू नका,कोणताही आजार अंगावर काढू नका,तातडीने आरोग्य तपासणी करून उपचार घ्या असा सल्ला दिला त्यामुळे कोरोना संकटात नागरीकांना दिलासा मिळाला आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघात एकूण ८० हजार कुटुंब असून या प्रत्येक कुटुंबापर्यंत आ.काळे सॅनिटायझर पोहोचवणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.