निवड
कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक…यांचा सत्कार संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी पोहेगाव येथील शेतकरी प्रगतिशील शेतकरी गंगाधर औताडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे यांनी नुकताच सत्कार केला आहे.
दरम्यान पोहेगाव येथील माजी आ.स्व.दादासाहेब शहाजी रोहमारे विकास सेवा सोसायटीवर स्विकृत सदस्य म्हणून जयंतराव रोहमारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवाजी जगताप यांनी व अजय रोहमारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार भाऊसाहेब सोनवणे यांनी केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी अलेल्या कर्मवीर शंकर राव काळे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती.त्यानंतर पदाधिकारी यांची निवड पार पडली असून नुकतीच स्वीकृत व तज्ज्ञ संचालकांची निवड जाहीर झाली आहे.त्यात पोहेगाव येथील प्रगतशील शेतकरी व कार्यकर्ते गंगाधर औताडे यांची निवड झाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान पोहेगाव येथील माजी आ.स्व.दादासाहेब शहाजी रोहमारे विकास सेवा सोसायटीवर स्विकृत सदस्य म्हणून जयंतराव रोहमारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवाजी जगताप यांनी व अजय रोहमारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार भाऊसाहेब सोनवणे यांनी केला.माजी आ.स्व.दादासाहेब शहाजी रोहमारे पतसंस्थेच्या स्वीकृत सदस्यपदी सुनील रोहमारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रंगनाथ जाधव यांनी व संदीप रोहमारे यांचा सत्कार मनोहर शेळके यांनी केला.
सदर प्रसंगी यावेळी डॉ.जगदीश झंवर,प्रमोद रोहमारे,अशोक रोहमारे,विनोद रोहमारे,भास्करराव रोहमारे,भागवत माळी,नंदकिशोर औताडे,बाळासाहेब औताडे,गोरख जाधव,राजेंद्र औताडे,मल्हारी देशमुख,सचिव रवींद्र गुजर,व्यवस्थापक राजेंद्र गायकवाड व संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सर्व नवनिर्वाचित स्विकृत संचालकांनी आभार व्यक्त करून मिळालेल्या संधीचे सोने करून करणार असल्याचे सांगितले आहे.