जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ५६१ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ३४ बाधित आढळले आहे.तर ४२ संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील ०४ तर नगर येथील प्रयोग शाळेतील ०६असे एकूण बाधित ३४ रुग्ण आढळले असून नगर येथे तपासणी साठी ११ स्राव पाठविले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३४ हजार ७८७ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ५५३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत दोन दिवसात दोन बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात १७ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात असे १७ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण ३४ संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे अन्नपूर्णानगर महिला-वय-७०,निवारा पुरुष वय-४८,महिला वय-३७,सुभद्रानगर पुरुष वय-२९,२०,कर्मवीरनगर पुरुष वय-५६,संजीवनी पुरुष वय-२६ महिला वय-२१,रिद्धीसिद्धी नगर पुरुष वय-२८,टाकळी नाका पुरुष वय-३५,महिला वय-१६,१४,१०,धारणगाव रोड पुरुष वय-३८,साईधाम पुरुष वय-६५,कापड बाजार पुरुष वय-६४,तेरा बंगले महिला वय-३४ आदींचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागात बाधित असलेले रुग्ण पुढील प्रमाणे वारी पुरुष वय-३२ महिला वय-२६,साखरवाडी पुरुष वय-३५,५४,४९,४५,महिला वय-६२,उक्कडगाव पुरुष वय-३५,२१,महिला वय-४०,मढी महिला वय-२१,कान्हेगाव पुरुष वय-३७,बहादरपूर पुरुष वय-३५.येसगाव पुरुष वय-२१,कोकमठाण पुरुष वय-३१,जवळके पुरुष वय-३७,कोळपेवाडी महिला वय-५५,आदींचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १५२० इतकी झाली आहे.त्यात १७२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २६ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७१ टक्के आहे.आतापर्यंत ०६ हजार ४०४ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २५ हजार ६१६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.७३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १३२२ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८६.९७ टक्के झाला आहे.दरम्यान या मोठ्या बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.