आरोग्य
शिर्डीत रुग्णालयात कोपरगावसाठी खाटा आरक्षित ठेवा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना बाधित गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवावे अशी महत्वपूर्ण मागणी आ.आशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्याकडे नुकतीच केली आहे.
कोरोना साथीत आतापर्यंत कोपरगाव तालुक्यातील २३ रुग्णांचे बळी गेले आहेत तर आतापर्यत १ हजार २०० रुग्ण बाधित झाले आहेत.व वर्तमानातही कोरोनाची साथ वाढतच आहे.मृत्युदर आज कमी वाटत असला तरी अद्याप तालुक्यातील धार्मिक स्थळे व शाळा महाविद्यालये सुरु झालेली नाही.त्यामुळे पुढील धोका अद्याप टळलेला नाही.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांची हि भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
कोरोना साथीत आतापर्यंत कोपरगाव तालुक्यातील २३ रुग्णांचे बळी गेले आहेत तर आतापर्यत १ हजार २०० रुग्ण बाधित झाले आहेत.व वर्तमानातही कोरोनाची साथ वाढतच आहे.मृत्युदर आज कमी वाटत असला तरी अद्याप तालुक्यातील धार्मिक स्थळे व शाळा महाविद्यालये सुरु झालेली नाही.त्यामुळे पुढील धोका अद्याप टळलेला नाही.या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बगाटे यांची नुकतीच भेट घेवून श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवण्याबाबत चर्चा केली आहे. कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आजपर्यंत तेवीस रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे.मात्र काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे या कोविड केअर सेंटरवर अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवल्यास रुग्णांवर वेळेत उपचार होवून त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे व मृत्युदर घटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी खाटा आरक्षित ठेवाव्या व कोरोना तपासणी प्रयोग शाळा सुरू करण्यासाठी आय.सी.एम.आर. कडे परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी केली असून सदर मागणीस मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी प्रतिसाद दिला असल्याचा दावा केला आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,मुख्य लेखा अधिकारी बाबासाहेब घोरपडे,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते आदी मान्यवर उपस्थित होते.