जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात पुन्हा मोठी रुग्ण वाढ !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात काल २९ रुग्ण वाढुन २० रुग्णांचे निधन झाले असताना आज कोपरगाव तालुक्यात आज २९ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्याचे अहवाल आज हाती आले आहे त्यात ०९ जण बाधित आढळले आहे.तर ३९ संशयित रुग्णांना घरी सोडून दिले आहे.नगर येथे तपासणीसाठी ४७ संशयितांचे अहवाल पाठवले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात १२ बाधित निष्पन्न झाले असून एकूण ३३ रुग्ण बाधित आढळले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

राज्यात रुग्णांचा आकडा ९ लाख ९० हजार ७९५ वर गेला आहे तर मृत्यू २८ हजार २८२ वर गेले आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २६ हजार ९१२ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३८७ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील २० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक आरोग्य कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.

आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या २१ तर ग्रामीण भागात १२ असे ३३ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे खडकी पुरुष वय-६८,अंबिका चौक पुरुष वय-४७, लक्ष्मीनगर पुरुष वय-२०, टाकळी नाका पुरुष वय-४०,इंदिरानगर चार महिला वय-३२,६७,६०,३२, धारणगाव रोड एक पुरुष वय-५८,स्टेशनरोड एक पुरुष वय-४९,दोन महिला १३,१८,येवला नाका एक पुरुष वय-१२,दोन महिला वय-४१,२१ तेरा बंगले एक महिला दिव्य-३८,बिरोबा चौक एक पुरुष वय-४१, एक महिला वय-३३,माळी बोर्डिंग एक पुरुष वय-७५,गुरुद्वारा रोड एक महिला वय-२८,शिंदे-शिंगीनगर एक पुरुष वय-२६ आदी २१ बाधित रुग्णांचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागात बक्तरपूर तीन महिला वय-४०,४२,८३,जेऊर कुंभारी एक पुरुष वय-४५,कोकमठाण दोन पुरुष वय-३२,२८ चासनळी तीन पुरुष वय-६१,५१,४५ तीन महिला वय-३८,५५,३२ आदी १२ आदी रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ११८६ इतकी झाली आहे.त्यात ९९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २० जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७७ टक्के आहे.आतापर्यंत ०५ हजार ०५९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २० हजार २३६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.४४ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १०६६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८९.८८ टक्के झाला आहे.दरम्यान या आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close