जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात आज पुन्हा रुग्ण वाढ सुरूच !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत १६ रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून कोपरगाव तालुक्यातील एक रुग्णांचे निधन झाले असून कोपरगाव तालुक्यात एकूण १८१ अँटीजन रॅपिड टेक्स्ट करण्यात लय असून त्यात २३ रुग्ण बाधित निघाल्याने रुग्णांची संख्या काल अखेर ८२५ इतकी झाली आहे.त्यात १६६ रुग्ण सक्रिय रुग्ण असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०७ हजार ०४१ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३४ लाख ६८ हजार २७२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ६० हजार ७५० वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ लाख ४७ हजार ९९५ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २३ हजार ७७५ वर जाऊन पोहचला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १९ हजार ०४६ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २७४ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.आज आलेल्या यादीत शहरात २४ तर ग्रामीण भागात ०५ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे

आज आढळलेल्या बाधित रुग्णांत सप्तर्षी मळा दोन पुरुष (वय-४९,१७),खडकी (वय-२४),भारत प्रेस रोड एक तरुण (वय-२२),लक्ष्मीनगर महिला (वय-४३),इंदिरा पथ पुरुष (वय-२२),धारणगाव रोड महिला (वय-५७), निवारा परिसर महिला (वय-५७),येवला रोड एक पुरुष (वय-५०),टिळक नगर एक तरुण (वय-२७),दत्तनगर दोन पुरुष (वय-५९,३६),गांधीनगर एक पुरुष (वय-८२) व दोन महिला (वय-६०,४०),गोरोबा नगर येथील एक महिला (वय-५०) असे अठरा जण बाधित रुग्ण आढळले आहे.तर ग्रामीण भागात कोळपेवाडी येथे एक पुरुष (वय-३५),बहादरपूर एक पुरुष (वय-४०),पोहेगाव येथे एक पुरुष (वय-६७) तर सोनेवाडी येथे एक महिला (वय-६३) तर धारण गाव येथे एक पुरुष (वय-३७)आदी पाच रुग्णांचा समावेश असून एकूण तेवीस रुग्ण बाधित आढळले आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ७०९ इतकी झाली आहे.त्यात ८२५ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १६ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.९३ टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार ९४४ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १५ हजार ७७६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २०.९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ६५३ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७९.१५ टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close