जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

फेरीवाल्यांसाठीच्या कर्ज योजनेचा लाभ घ्या-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्याचे उद्योग-व्यवसाय जवळपास बंद झाल्याने त्यांना या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्यावसायिकांना बँकेमार्फत खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.याचा कोपरगाव शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच केले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी सरकारने ५ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे.दरम्यान कर्ज घेण्यासाठी तारण देण्याची किंवा कोणतीच हमी देण्याची गरज नसणार आहे.रस्त्याच्या बाजूला दुकान लावणारे,ठेला लावणाऱ्या लोकांना या योजनेतून कर्ज मिळणार आहे.फळे-भाजीपाला,लॉण्ड्री,केसकर्तनालये,पान दुकानांचा यात समावेश करण्यात आला आहे.फारच सोप्या अटींवर हे कर्ज दिले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या सत्रातील पहिली मंत्रिमंडळाची बैठक ३ जून रोजी पार पडली.या बैठकीत (एमएसएमई) सुक्ष्म,लघु,आणि मध्यम क्षेत्रातील तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांविषयी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.या निर्णयाने दुकानदार आणि छोटे उद्योग धंदे करणाऱ्या लोकांचं आय़ुष्य बदलणार आहे.यावेळी सरकारने स्वनिधी योजनेची सुरुवात केली आहे.ठेला,फेरीवाले,आणि छोटे दुकानदारांना सरकार कर्ज देणार आहे. या कर्जाच्या मदतीने हे व्यवसायिक आपले कामकाज परत चालू करू शकतील.या योजनेतून व्यवसायिकांना १० हजार रुपयांचे कर्ज भेटणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी सरकारने ५ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे.दरम्यान कर्ज घेण्यासाठी तारण देण्याची किंवा कोणतीच हमी देण्याची गरज नसणार आहे.रस्त्याच्या बाजूला दुकान लावणारे,ठेला लावणाऱ्या लोकांना या योजनेतून कर्ज मिळणार आहे.फळे-भाजीपाला,लॉण्ड्री,केसकर्तनालये,पान दुकानांचा यात समावेश करण्यात आला आहे.फारच सोप्या अटींवर हे कर्ज दिले जाणार आहे. यासाठी कोणतीच हमी अथवा गॅरंटी देण्याची गरज नाही.रस्त्यावर दुकाने लावणाऱ्यांसाठी ही फार महत्त्वाची योजना असून याचा फायदा घेत दुकानदार आपला व्यवसाय परत सुरू करू शकतील.या योजनेसाठी सरकारने ५ हजार रुपयांची तरतूद केली असून यातून ५० लाख दुकानदारांना, ठेले लावणाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचा आशा वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ७ टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे, या कर्जासाठी गारंटीची गरज नाही. मोबाईल ऐप आणि वेब पोर्टलवरून आपण यासाठी अर्ज करु शकता. वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास व्याजावर ७ टक्क्यांचे अनुदान मिळणार आहे.हा सूक्ष्म-पतपुरवठा करण्यासाठी शासन निर्देशाप्रमाणे दि.२४ मार्च पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना बँकेमार्फत प्रती लाभार्थी रुपये १० हजार कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून मिळालेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केल्यास त्यांना ७ टक्के दर तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

तसेच फेरीवाल्यांनी आपला दैनदिन व्यवहार करतांना ग्राहकांकडून डिजिटल जसे पेमेंट जसे फोन पे/ भारत पे/ पिटीएम/ एमएसविपे/ एफटी कॅश इ. माध्यमाचा वापर केल्यास रु.५० ते १०० याप्रमाणे दरमहा कॅश बॅक मिळणार आहे.केंद्र व राज्य शासन, नगर विकास विभाग यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि मार्केट विभाग यांच्या मार्फत शहरातील पथविक्रेते यांचे कायम, हंगामी, व तात्पुरते या गटात बायोमॅट्रिक पद्धतीने सर्वेक्षण दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दरम्यान करण्यात आले आहे. सदरील सर्वेक्षणामध्ये एकूण १०४६ पथविक्रेते यांची नोंदणी झाली आहे.आज अखेर १०४६ पैकी २०५ फेरीवाले यांनी http://pmsvanidhi.mohua.gov.in या पोर्टलवर स्वतः अॅन्ड्रॉइड मोबाइलद्वारे तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज भरलेले आहे.त्यापैकी ५ फेरीवाल्यांचे प्रस्ताव बँक ऑफ इंडिया,कोपरगाव शाखेने मंजूर केलेले आहे.उर्वरित बँकांनी देखील आपणास प्राप्त प्रस्ताव बैठकीत झालेल्या चर्चे नुसार त्वरित मंजूर करावे. फेरीवाले यांनी प्रथम आपले आपल्या आधारकार्ड सोबत आपला मोबाइल नंबर जोडलेला असल्याची खात्री करावी. किंवा नसल्यास आपल्या आधारकार्ड सोबत मोबाईल जोडणी करून घ्यावा. सदर मोबाईल नंबरच्या आधारे पोर्टलवर लॉगीन करून प्राप्त सूचनांच्या आधारे आपला अर्ज भरत असतांना आधारकार्ड नंबर, फेरीवाला गट निवडीसाठी आपल्या शहरातील सर्वेक्षण यादीनुसार फेरीवाले यांनी आपले अर्ज भरतांना (व्हेंडर कॅटेगरी) बी (B) हा पर्याय निवडावा. व त्यानंतर आपले सविस्तर माहिती जसे बँक,आय.एफ.एस.सी.कोड,खाते नंबर,दोन परिचित व्यक्तींची नावे मोबाईल नंबर,पत्ता,बँक निवड आदी माहिती अचूक नोंद करावी. भरलेला अर्ज बाद होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.या सर्व प्रक्रिया दरम्यान फेरीवाले यांना काही अडचण वाटल्यास नगरपरिषदेच्या मार्केट विभाग प्रमुख योगेश्वर खैरे,राजु गाढे,चंद्रकांत साठे किंवा डे-एनयुएलएम विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट,रामनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close