आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढ थांबण्याचे नाव घेईना !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात काल अखेर ६५ कोरोना रुग्ण आढळण्याचा विक्रम स्थापित झाला असताना आज १९४ अँटीजन रॅपिड टेस्टसह नगर येथे पाठवलेले १६ अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात एक टाकळी फाटा येथील महिलेसह ३३ व्यक्ती बाधित निघाल्या असून अन्य त्यात २४ जणांचे अहवाल निरंक आले आहे तर आज अखेर २४ जणांना उपचारानंतर सोडून दिले आहे.बाधित रुग्णांत रवंदे येथे ७ तर पोहेगावात ४,जेऊर पाटोदा,टाकळी, कारवाडी,संजीवनी कारखाना प्रत्येकी ३,सोनारी येथे २ निवारा,कोळगाव थंडी,ब्राम्हणगाव,शिंगणापूर,येसगाव,चांदेकसारे,अंचलगाव प्रत्येकी १ असे रुग्ण बाधित आढळले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यानी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान काल एक ८२ वर्षीय ब्राम्हणगाव येथील पुरुषाचे निधन झाल्याचे विश्वसनीय वृत्त आले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव तालुक्याला कोरोना साथीचे ग्रहण लागले असून एका पाठोपाठ रुग्ण संख्येची वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे या संकटातून आता नागरिकांची कशी सुटका करायची याची चिंता तालुका प्रशासनास लागून राहिली आहे.आता कोपरगाव शहरात पुन्हा एकदा टाळेबंदी अकरण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढू लागला आहे.मात्र जिल्हा पातळीवर महासुलचे वरिष्ठ अधिकारी मात्र त्याला अनुकूल नसल्याची माहिती आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण लक्ष्मीनगर येथे १० एप्रिल रोजी आढळला होता.त्या नंतर कोपरगाव शहर व तालुका बऱ्यापैकी कोरोना मुक्त म्हणून नियंत्रणात होता.मात्र गत सप्ताहापासून मात्र कोपरगाव तालुक्याला कोरोना साथीचे ग्रहण लागले असून एका पाठोपाठ रुग्ण संख्येची वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे या संकटातून आता नागरिकांची कशी सुटका करायची याची चिंता तालुका प्रशासनास लागून राहिली आहे.आता कोपरगाव शहरात पुन्हा एकदा टाळेबंदी अकरण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढू लागला आहे.मात्र जिल्हा पातळीवर महासुलचे वरिष्ठ अधिकारी मात्र त्याला अनुकूल नसल्याची माहिती आहे.
दरम्यान आज आढळलेल्या रुग्णांत रवंदे येथे सात रुग्ण आढळले आहे त्यात ३ पुरुष (त्यांचे वय ९,४,३५) तर ४ स्रिया (वय-३४,५४,११,२६) यांचा समावेश आहे याशिवाय पोहेगाव येथे चार रुग्ण आढळले असून यात १ पुरुष (वय-६०)आणि ३ स्रिया (वय-५५,३८,८०)यांचा समावेश आहे.जेऊर पाटोदा हद्दीत एकूण ३ बाधित रुग्ण आढळले असून यात १ पुरुष (वय ११ महिने,आणि २ स्रिया (वय-४९,१९) यांचा समावेश आहे.टाकळीत एकूण तीन रुग्ण बाधित आढळले असून यात एक २४ वर्षीय तरुण तर दोन २१,व ४५ वर्षीय स्रिया आढळल्या आहेत.संजीवनी कारखाना येथे तीन रुग्ण बाधित आढळले असून यात एक ३१ वर्षीय पुरुष व दोन ६०,२० वर्षीय स्रिया यांचा समावेश आहे.या शिवाय सोनारी ग्रामपंचायत हद्दीत दोन बाधित रुग्ण आढळले असून यात एक ३५ वर्षीय पुरुष एक ४० वर्षीय स्त्रीचा समावेश आहे.कारवाडी येथे तीन बाधित रुग्ण आढळले असून त्यात एक ७५ वर्षीय पुरुष दोन ६९,व ४२ वर्षीय स्रिया आढळल्या आहेत.कोळगाव थडी येथे एक ७९ वर्षीय स्त्री व निवारा परिसर येथे एक २८ वर्षीय स्त्री बाधित आढळली आहे.या खेरीज टाकळी फाटायेथे ४० वर्षीय पुरुष,ब्राम्हणगाव येथे ४१ वर्षीय पुरुष,शिंगणापूर येथे ६७ वर्षीय पुरुष ,येसगाव येथे ५० वर्षीय पुरुष,चांदेकसारे येथे ६५ वर्षीय पुरुष,अंचलगाव ६२ वर्षीय पुरुष आदी बाधित रुग्ण आढळले आहे.