आरोग्य
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक,सर्व उच्चान्क मोडले
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात आज कोरोना रुग्णांचा विक्रम स्थापित झाला असून आज २५८ रॅपिड चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात कोपरगाव सह संजीवनी कारखाना परिसर व ग्रामीण भागातील २२ गावात ६५ रुग्ण बाधित निघाले असून त्यात २५८ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये ६१ बाधित निघाले आहे तर खाजगी प्रयोग शाळेत २ रुग्ण बाधित निघाले आहे यात एक १० महिन्याचे बाळ व ब्राम्हणगाव येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.त्यामुळे आजपर्यंत निघलेल्या रुग्णांचा आज उच्चान्क मानला जात आहे.त्यामुळे आता ग्रामीण भागही कोरोनाने विळख्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोपरगाव तालुक्यात विशेषतः आता हि साथ शहरासह छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे मंजूर,पढेगाव,करंजी,सुरेगाव पाठोपाठ आता धारणगाव व आता येसगाव व कोळपेवाडी,मळेगाव थडी,सोनारी,डाऊच खुर्द,अंचलगाव,आपेगाव,कारवाडी,देवगाव,सांगवीभुसार,चांदेकसारे,शिरसगाव,पोहेगावातही मोठ्या प्रमाणावर पोहचली असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज १४ हजार ७३३ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १९ लाख ७७ हजार ९७२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ४० हजार ८८८ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा काल दिवसभरात ४ लाख ६८ हजार २६५ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १६ हजार ४७६ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०६ हजार ९०७ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ८१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर येथील सारीचा रुग्ण धरून तीन बळी गेले आहे.तर आत्ता पर्यंत तालुक्यात शहरासह या पूर्वीच २७४ रुग्ण बाधित झाले आहेत.अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.विशेषतः आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे मंजूर,पढेगाव,करंजी,सुरेगाव पाठोपाठ आता धारणगाव व आता येसगाव व कोळपेवाडी,मळेगाव थडी,सोनारी,डाऊच खुर्द,अंचलगाव,आपेगाव,कारवाडी,देवगाव,सांगवी भुसार,चांदेकसारे,शिरसगाव,पोहेगावातही मोठ्या प्रमाणावर पोहचली असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान आज आलेल्या बाधित रुग्णाच्या यादी प्रमाणे गावनिहाय कोरोना बाधित रुग्ण यापुढील प्रमाणे कोपरगाव शहर व उपनगरे मिळून एक स्त्री आणि १० पुरुष रुग्ण आढळले आहे.संजीवनी कारखाना परिसर स्रिया ७ तर पुरुष ११ आढळले आहे.शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत ४ स्रिया आणि २ पुरुष आढळले आहे.याशिवाय पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत २ स्रिया बाधित आढळल्या आहेत.सांगवी भुसार हद्दीत २ पुरुष बाधित आढळले आहे.तर ब्राम्हणगाव येथे २ स्रिया आणि १ पुरुष बाधित आढळले आहे.याखेरीज चांदेकासारे हद्दीत १ पुरुष तर येसगाव येथे २ पुरुष बाधित आढळले आहे.या शिवाय शिरसगाव येथे १ पुरुष बाधित आढळला आहे.या शिवाय टाकळी आणि डाऊच बुद्रूक येथे प्रत्येकी दोन पुरुष आढळले आहे.कोळगाव थडी,निमगाव,रवंदे,मंजूर,सोनारी,अंचलगाव,देर्डे-कोऱ्हाळे,देर्डे चांदवड,आपेगाव,कोकमठाण,कारवाडी,देवगाव येथे प्रत्येकी एक पुरुष बाधित आढळला आहे.