आरोग्य
रस्ता लुटीतील आरोपीच कोरोना बाधित,पोलीस तणावात
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानजीक टाकळी फाट्यानजीक दि.९ फेब्रुवारी रोजी रस्ता लुटीत सामील असलेले पाच आरोपी चार दिवसांपूर्वी कोपरगाव तालुका पोलिसानी श्रीरामपूर येथून जेरबंद करून आणले मात्र तेच कोरोना बाधित आढळल्याने त्यांना अटक करून आणणारे तालुका पोलीस ठाण्याचे चार शिपाई व शहर पोलीस ठाण्याचे एक पोलीस कर्मचारी मात्र भलतेच तणावात आले असून त्यांची तपासणी करण्याची जय्यद तयारी सुरु झाली आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.आज सकाळ पासून बाधित रुग्णांची संख्या आता आठ झाली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी नुकतेच श्रीरामपूर येथून नुकतेच रस्ता लुटीतील चार आरोपी अटक करून कोपरगाव येथे आणले होते.त्यांनी कोपरगाव शहरानजीक टाकळी फाट्यानजीक दि.९ फेब्रुवारी रोजी रस्ता लुट केली होती व त्या गुन्ह्यात ते फरारी होते.मात्र त्या पाच आरोपींचा तालुका पोलिसानी ठावठिकाणा शोधून त्यांना नुकतेच जेरबंद केले होते.व त्यांना कोपरगाव येथील न्यायालयापुढे हजर करून त्याना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.मात्र त्यांची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील प्रयोगशाळेत पाठवले होते त्यांचे ते अहवाल आले असून ते कोरोना बाधित आढळले आहे.
कोपरगाव शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण १० एप्रिल रोजी आढळला होता.त्यात लक्ष्मीनगर येथील महिलेचा पहिला मृत्यू नोंदवला गेला त्या नंतर अभावानेच एखाददुसरा रुग्ण आढळत होता व काही काळानंतर तो रुग्ण बारा होऊन शहरात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या निरंक होऊन दिलासा मिळत होता मात्र गत तीन दिवसापासून मात्र कोरोना बाधित रुग्णांची सलग मालिका सुरु झाली आहे.बुधवार दि.२९ जुलै रोजी आठ रुग्ण आढळले होते.त्या पाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी सोळा रुग्णांची नोंद झाली. व आज सकाळी पुन्हा तीन रुग्ण आढळले आहे.त्या नंतर कोपरगाव तालुका पोलिसानी नुकतेच श्रीरामपूर येथून नुकतेच रस्ता लुटीतील चार आरोपी अटक करून कोपरगाव येथे आणले होते.त्यांनी कोपरगाव शहरानजीक टाकळी फाट्यानजीक दि.९ फेब्रुवारी रोजी रस्ता लुट केली होती व त्या गुन्ह्यात ते फरारी होते.मात्र त्या पाच आरोपींचा तालुका पोलिसानी ठावठिकाणा शोधून त्यांना नुकतेच जेरबंद केले होते.व त्यांना कोपरगाव येथील न्यायालयापुढे हजर करून त्याना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.मात्र त्यांची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील प्रयोगशाळेत पाठवले होते त्यांचे ते अहवाल आले असून ते कोरोना बाधित आढळले आहे.त्यांच्या समवेत उपकारागृहातील ६८ आरोपींची नुकतीच तपासणी केली आहे त्यात हे पाच जण कोरोना बाधित आढळून आले असल्याची विश्वसनिय माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.
आता आज बाधित आढळलेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे.या प्रसंगामुळे त्या आरोपींना अटक करून आणणाऱ्या पोलिसांना आता घाम पुसण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.वर्तमानात पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आपले प्राण जोखमीत टाकून आपले कर्तव्य बजावत आहे त्यांना या कामात नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आपले प्राण जोखमीच्या टाकावे लागत आहे.त्यामुळे नागरिकांनी विनाकारण शहर व गावात भटकणे बंद करून त्याना सहकार्य करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.