आरोग्य
आता वेळापुरात कहर,रुग्ण संख्येत झाली वाढ
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत संशयित असलेल्या सतरा जणांचे अहवाल काल रात्री उशिरा आले असून त्यात बाधित रुग्णाच्या घरातील मुलगी,आई.बहीण,पत्नी असे सात व रुग्णावर उपचार करणारे एक डॉक्टर असे आठ जण बाधित निघाले होते. या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध आरोग्य प्रशासनाने घेतला असून जवळपास नव्वद जण संशयित आढळले असून यात सिन्नर तालुक्यातील सहा जण असून उर्वरित ८४ जण कोपरगाव तालुक्यातील असल्याची विश्वसनिय सूत्रांनी माहिती दिली आहे.अजून शोध सुरु आहे.त्यांचे नवीन तंत्राप्रमाणे जागेवरच अहवाल रॅपिड डायग्नोस्टिक किटद्वारे तयार करण्यात आला असून त्यात वेळापूर येथील एक पंचेचाळीस वर्षीय महिला बाधित निघाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
सुरेगाव येथील ८४ व ईशान्य गडावरील एक असे जवळपास ८५ अहवालाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून होते मात्र आता करंजी व ईशान्य गड व वेळापूर येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे अहवाल काय येतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.आता सुरेगाव,वेळापूर धरून आता बाधित रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.रॅपिड डायग्नोस्टिक किटमुळे आता जलद रुग्ण शोधण्यास मदत मिळणार आहे.त्यामुळे तालुक्यात आता कोरोना साथ लवकर नियंत्रण होईल असा आशावाद वाढला आहे.
कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती त्यानंतर सुरेगाव येथे पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना बाधित रुग्ण निघाल्याने खळबळ उडाली होती.संबंधित रुग्ण औरंगाबाद येथे औद्योगिक वसाहतीत काम करीत असून मूळ सुरेगाव येथील रहिवाशी आहे.त्यास उपचारासाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याशी संबंधित अन्य सतरा नागरिकांना ताब्यात घेतले होते.त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असताना करंजीत काल एक महिला बाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे.या महिलेच्या संपर्कात आलेल्या अन्य संशयित १५ व्यक्तींना दोन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे.व त्यांना कोपरगाव येथील विलंगीकरण कक्षात रवानगी केली असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आता तालुक्यातील सुरेगाव येथील १७ जणांचे अहवाल आले असून त्यात आठ जण बाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे तर व करंजी येथील १५ संशयित नागरिकांचे अहवाल प्रलंबित आहे.त्या नंतर कोपरगाव नजीक असलेल्या ईशान्य गडावर एक भांडाराशी संबंधित एक अधिकारी या सुरेगाव मधील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे त्यांचा श्राव काल सायंकाळी ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवला असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिल्याने कारखाना प्रशासन तणावात आले आहे.आता सुरेगाव येथील ८४ व ईशान्य गडावरील एक असे जवळपास ८५ अहवालाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून होते मात्र आता करंजी व ईशान्य गड येथील अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.आता सुरेगाव,वेळापूर धरून आता बाधित रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.अजूनही या नऊ बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम तालुका प्रशासनाने सुरु ठेवलेच असल्याने या संशयितात वाढ होण्याची शक्यता आहे.