आरोग्य
तोंडाला मुखपट्टी बांधली नाही,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरांतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास कोपरंगाव शहर पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी संदीप रामनाथ गायकवाड (वय-३५) रा.गोदाम गल्ली हा शहरात कोरोना साथ चालू असल्याची माहिती असतानाही आपल्या तोंडाला मुखपट्टी न बांधता फिरताना आढळून आल्याने शहर पोलिसानी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे बेजबाबदार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात सध्या कोरोना साथीचे अनेक रुग्ण आढळून आले होते.त्यावर उपचार सुरु होते.ते नुकतेच निरंक आले असले तरी नजीकचे येवला,वैजापूर,सिन्नर,नाशिक,नगर,औरंगाबाद,संगमनेर आदी शहरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात वर्तमानात कोरोना रुग्ण नसला तरी अद्याप धोका टळलेला नाही.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे-विजय वहाडणे-नगराध्यक्ष.
कोपरगाव शहरात सध्या कोरोना साथीचे अनेक रुग्ण आढळून आले होते.त्यावर उपचार सुरु होते.ते नुकतेच निरंक आले असले तरी नजीकचे येवला,वैजापूर,सिन्नर,नाशिक,नगर,औरंगाबाद,संगमनेर आदी शहरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात वर्तमानात कोरोना रुग्ण नसला तरी अद्याप धोका टळलेला नाही.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.मात्र अद्यापही काही नागरिक आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहेत.त्यामुळे अन्य नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो.मात्र जेंव्हा अशा नाठाळ नागरिकांना प्रशासनाची संकेतांची भाषा कळत नाही त्यावेळी पोलिसांना आपल्या दंड्याचे काम नाईलाजाने सुरु करावे लागते.तीच परिस्थिती वर्तमानात उद्भवली आहे.त्यामुळे पोलिसानी आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास असेच बेजबाबदारीचे प्रदर्शन करताना आरोपी संदीप गायकवाड हा आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.२५६/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,२९० प्रमाणे जिल्हा दंडाधिकारी,अहमदनगर यांचे कडील आदेश क्रमांक आ.व्य.म.पु/कार्या/१९अ/२१०/२०२० अन्वये कोरोना विषाणु(कोवीड-१९) प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतीबंधक कायदा-१८९७ अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लघन करुन विनापरवाना तोंडाला मुखपट्टी न बांधता कोपरगाव शहरात फिरतांना मिळुन आला.वगैरे मजकुराचा गुन्हा फिर्यादी अर्जुन मच्छीन्द्र दारकुंडे यांनी दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मांनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री गायमुखे हे करीत आहेत.