आरोग्य
…या हॉस्पिटलला अत्याधुनिक संगणकीय साहित्याची देणगी

न्युजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
मुंबई स्थित प्रिझमा ग्लोबल लिमिटेडचे संचालक आणि साईभक्त डॉ.श्रीराम आय्यर यांनी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाला PACS प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सुमारे साडेबारा लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक सर्वर,स्टोरेज आणि वर्कस्टेशन देणगी स्वरूपात प्रदान केले आहे.

या अत्याधुनिक संगणकीय उपकरणांमुळे PACS प्रणाली अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित होणार असून,वैद्यकीय डेटा दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.
दरम्यान या संगणकीय उपकरणांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन श्री साईबाबा हॉस्पिटल येथे करण्यात आले आहे.संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि देणगीदार डॉ.श्रीराम आय्यर यांच्या हस्ते या सुविधा रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या आहे.या प्रसंगी अमिताभ राय चौधरी,हरी जनार्दन,मयूर टोपर आणि रजत भोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या अत्याधुनिक संगणकीय उपकरणांमुळे PACS प्रणाली अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित होणार असून,वैद्यकीय डेटा दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल संस्थानच्या वतीने डॉ.श्रीराम आय्यर यांचा साईबाबांची मूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात आला आहे.साई संस्थान हॉस्पिटलला ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहे.
ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी संस्थानच्या आय.टी.विभागाने घेतलेल्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले.त्यांच्या समर्पित योगदानामुळेच ही अत्याधुनिक प्रणाली यशस्वीरीत्या स्थापित होऊ शकली.
सदर प्रसंगी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट.कर्नल(नि) डॉ.शैलेश ओक,डॉ.उमेश व्यवहारे,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,आय.टी. विभागप्रमुख अनिल शिंदे,साईप्रसाद जोरी,सहाय्यक आधीसेविका मंदा थोरात,रुग्णालय जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण संगणकीय देणगीमुळे श्री साईबाबा हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी आणि अत्याधुनिक होणार आहे.