आरोग्य
…या रुग्णालयाची रुग्णांना मोफत वैद्यकीय योजना सुरू !
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित,’आत्मा मलिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ने आपल्या परिसरातील आणि नजीकच्या जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आपल्या रुग्णालयात मोफत उपचार सुरू केली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जनसामान्यांसाठी सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करत असते.या योजनांचा फायदा सामान्य जनतेला रोजच्या आयुष्यात होतो.अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य,शिक्षण या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सरकार विविध योजना आणते.अशा योजनांमधून सरकार सामान्य लोकांना सोई-सुविधा उपलब्ध करून देत असते.यातील एक योजना ही ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ ही आहे.या योजनेमार्फत गरजूंना आरोग्यविषयक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.आता एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति वर्ष प्रती कुटुंब पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये योजनेशी संलग्नित सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात केले जातात.ही योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सर्वसमावेशक वैद्यकीय कव्हरेज देते.मात्र बरेच हॉस्पिटल याची अंमलबजावणी करताना दिसत नाही त्यातून रुग्णालये आपल्याकडे आलेल्या रुग्णाची लूट करत असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.त्यातून आपल्या परिसरातील रुग्णांची सुटका व्हावी यासाठी जंगली महाराज आश्रम ट्रस्टने आज सर्वांना,’मोफत वैद्यकीय सुविधा’ (त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सूविधा ) उपलब्ध करून देण्याची घोषणा अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केली आज आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सदर प्रसंगी आत्मा मलिक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नितीन पाटील,व्यवस्थापक सुनील पोकळे,प्रसिध्दी प्रमुख अक्षय कांद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी नंदकुमार सुर्यवंशी म्हणाले की,”आत्मा मलिक हॉस्पिटल मध्ये दिनाक ०१ डिसेंबर पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले असून ते २१ जून २०२२५ या आगामी योग दिवसा पर्यंत सुरू राहणार आहे.त्यासाठी नागरिकांना या शिबिरात अनेक तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यात ब्लड प्रेशर,मधुमेह,एक्स रे,दंत आरोग्य तपासणी,प्राथमिक उपचार,नेत्र तपासणी,प्रयोग शाळा तपासण्या सी.बी.सी.बी.एस.एल.आदी होणार आहेत.
दरम्यान शिबिर कालावधीत सर्व प्रकारचे एक्स रे केवळ १०० रुपयांत होणार आहे तर सोनोग्राफी हे कवळ ४०० रुपयांत तर अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी उपचार मोफत होणार आहे.मेडिकलमध्ये उपलब्ध औषधावर रुग्णांना २० टक्के सवलत दिली जाणार आहे.या शिवाय सी.टी.स्कॅन व लॅबवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.तर याशिवाय एन.सी.यू.सेवा पूर्णपणे मोफत देणार आहे.
सदर शिबिर सुरू झाल्या पासून आज पर्यंत ८३७ रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती सुर्यवंशी यांनी दिली असून हे उद्दिष्ट आगामी काळात ३५ हजार रुग्णांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.या योजनेचे नगर,नाशिक,संभाजीनगर येथील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी जोरदार स्वागत केले आहे.
सदर हॉस्पिटल हे १०० खाटांचे असून यामध्ये एक्स रे स्कॅन,सी.टी.स्कॅन,सोनोग्राफी,चार अत्याधुनिक शस्त्रक्रिया हॉल उपलब्ध आहे.या शिवाय कॅथ लॅब,डायलिसिस मशीन,फुप्फुस,मेंदू,किडनी,हृदयविकाराने त्रस्त असलेल्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.आय.सी.यू.साठी १८ बेड आहेत.तर तितक्यात एन.आय.सी.यू साठी बेड उपलब्ध आहे.या स विधांचा लाभ नगर,नाशिक,संभाजी नगर येथील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शेवटी अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले आहे.