आरोग्य
नांदुर्खी शेतकऱ्याने नागरिकांना केले कोबीचे वाटप

संपादक-नानासाहेब जवरे
कोऱ्हाळे-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूच्या साथीने जगात थैमान घातले आहे त्यातच संपूर्ण देश लॉक डाऊन झाल्याने हातावरचे पोट असणाऱ्यांची आर्थिक दुर्बल घटकांची उपासमार होत आहे. या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील नांदुर्खी खुर्द येथील शेतकरी आप्पासाहेब अण्णासाहेब वाणी यांनी आपले शेतात असणारी कोबी स्वखर्चाने तोडून नागरिकांना सकाळी भाडोत्री मालवाहू गाडीच्या सहाय्याने कनकुरी तसेच परिसरातील अडचणीच्या काळात नागरिकांना मोफत वाटप केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशात व राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे अंतिम अशा परिस्थितीत करोनाग्रस्तांची झपाट्याने संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.यात सर्वाधिक हाल हातावर पोट असलेल्या नागरिकांचे व मजुरांचे होत आहे.अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यांना जगण्यासाठी सहाय्यभूत होण्यासाठी अनेक संघटना बाहेर पडत आहेत.
देशात व राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे अंतिम अशा परिस्थितीत करोनाग्रस्तांची झपाट्याने संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.यात सर्वाधिक हाल हातावर पोट असलेल्या नागरिकांचे व मजुरांचे होत आहे.अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यांना जगण्यासाठी सहाय्यभूत होण्यासाठी अनेक संघटना बाहेर पडत आहेत.म्हणून या दात्याचे दातृत्व अद्याप संपलेले नाही.ज्या वेळी देशातील नागरिक अडचणित येईल त्यावेळी हाच शेतकरी मदतीला धावून आल्या शिवाय रहात नाही.याची अनेक उदाहरणे या देशांत आहेत.याचाच अनुभव वर्तमानात आला असून नांदुरखी येथील युवा शेतकरी तसेच पत्रकार आप्पासाहेब वाणी यांनी कोरोनामुळे आपले देशबांधव अडचणीत आल्याचे ओळखून आपला जो उपलब्ध शेतमाल कोबी लागलीच स्वःखर्चाने गावात फिरून नागरिकांना घर पोहच केला आहे.
याप्रसंगी विठ्ठल पवार, रमेश डांगे, शिवाजी चौधरी, शिवाजी राजपूत, उपसरपंच विनायक जपे, अनिल भांबारे, पत्रकार दत्तात्रय वाणी, वीरेश पगारे, राजेंद्र बनसोडे उपस्थित होते त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.