आरोग्य
…या शहरात नेत्र शिबिर उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील श्री साईगांव पालखी सोहळ्यानिमित्त जेष्ठ नागरिक सेवा मंच जेष्ठ महिला समिती आनंद ऋषी हाॅसपिटल यांच्या वतीने डॉ.सतीश अजमेरा हाॅसपीटल येथे नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
श्रीमती शकुंतलाबाई मोतीलाल शिंगी परिवार व स्व. गेंदाबाई फकिरचंद धाडीवाल यांच्या स्मरणार्थ तेजमल धाडीवाल परिवाराच्या सहकार्याने शिबिर यशस्वी करण्यात आले होते.
दरम्यान सदर शिबिरात ३२० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यातील ३५ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे व उद्योजक कैलास ठोळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे.
सदर शिबिरासाठी शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.शिबिर यशस्वी करण्यासाठी जेष्ठ नागरिक सेवा मंचचे सभासद,मुंबादेवी तरुण मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.