आरोग्य
…या शहरात मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
…या शहरात मोफत अस्थिरोग शिबिराचे आय
कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंच,जेष्ठ महिला समिती व अहमदाबाद येथील शैल्बी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता मोफत अस्थीरोग शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबादेवी तरुण मंडळ विविध सामाजिक व धार्मिक कार्यासाठी ओळखले जात असून त्यांनी यावर्षी पौराणिक ग्रंथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्री विष्णू पुराण या ग्रंथाचे कथेचे गुडीपाडवा मंगळवार दि.०९ एप्रिल ते १६ एप्रिल रोजी पुण्याचे प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या सुस्राव्य वाणीतून तहसील मैदान येथे संत ज्ञानेश्वर नगरीत आयोजन केले आहे.त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन केले आहे.या अस्थीरोग शिबिराचे आयोजन कोपरगाव येथील श्रीराम मंदिर रोड येथील डॉ.अजमेरे हॉस्पिटल येथे केले आहे.
दरम्यान सदर शिबिरात उतार वयात अतिवजन,अतिश्रम,वा अन्य कारणामुळे गुडघ्यांची झालेली झीज,गुडघ्यांची शस्र क्रिया,रुग्णांची मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.त्यासाठी अहमदाबाद येथील वैद्यकीय उपचार करण्यासाठी प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ.ब्रिजेश पटेल,डॉ.आकाश चौपागर,डॉ.रवी सूर्यवंशी आदी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान या शिबिरासाठी रुग्णांनी येताना नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.येणाऱ्या रुग्णांनी आपले जुने एक्स रे, अहवाल आणणे गरजेचे असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.नांव नोंदणीसाठी शांता मेडिकल,चिंतामणी औषध घर आदी ठिकाणी सोय करण्यात आली असल्याने याचा फायदा गरजू नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.