जाहिरात-9423439946
आरोग्य

…या शहरात सर्व रोग निदान शिबिर संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल व कोपरगाव ब्राह्यण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे मोफत ‘सर्व रोग निदान शिबिर’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.सदर शिबिरात १३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

ब्राह्यण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने कै.पुरुषोत्तम को-हाळकर यांचे स्मरणार्थ कोपरगांव शहरातील सर्वासाठी सर्व रोग निदान शिबिर रविवार दि.२५ फेब्रुवारी मोठ्या उत्साहात आयोजित केले होते.याचा १३५ रुग्णांनी लाभ घेतला आहे.

ब्राह्यण सभा,कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने कै.पुरुषोत्तम को-हाळकर यांचे स्मरणार्थ कोपरगांव शहरातील सर्वासाठी सर्व रोग निदान शिबिर रविवार दि.२५ फेब्रुवारी मोठ्या उत्साहात आयोजित केले होते.या शिबिराचे उदघाटन प्रसिध्द उदयोजक नरेंद्र तथा बाळासाहेब कुर्लेकर यांचे हस्ते झाले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगांव गॕस कंपनीचे चालक अविनाश सातपुते होते.

  सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,ऐश्वर्या सातभाई,प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,एस.जे.एस.हाॕस्पीटल चे व्यवस्थापक लक्ष्मण बागडे,जगमोहन चिकटे,संजय कुलकर्णी,वनिता मंडळाच्या अध्यक्षा वंदना चिकटे,सुनिता को-हाळकर आदि उपस्थित होते. 

   सदर प्रसंगी प्रसिध्द बांधकाम प्रसाद नाईक यांनी अशा प्रकारचे सर्व रोग निदान शिबिर दरवर्षी आयोजित करण्याचे जाहिर केले आहे.
     या शिबिरांमध्ये रक्तदाब,शुगर,२ डी. ईको,इसीजी,नेत्रविकार,फिजिओथिरेपी,इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.गरजुना मोफत औषधे वितरीत करण्यात आली आहे.या शिबिरात अनुभवी तज्ञ डाॕक्टर यांचे वतीने रुग्णांना योग्य ते  मार्गदर्शन व सल्ला दिला गेला.ज्या रुग्णांना पुढील तपासणीची  आवश्यकता आहे अशा रुग्णांना हाॕस्पीटल मध्ये निमंत्रित करण्यात आले आहे.


   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर्या महाजन यांनी केले तर स्वागत संदीप देशपांडे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांनी मानले आहे.

सदर शिबिरासाठी जनार्दन स्वामी हाॕस्पीटलचे वैदयकीय पथकांमध्ये डाॕ.लक्ष्मण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली
डॉ. सिद्धेश भोईर,डॉ.सिंग,डॉ.आकांक्षा कुलकर्णी,डॉ.जगदाळे,डॉ.मनीषा सपकाळ,डॉ.अनिरुद्ध उबाळे तसेच वैदयकीय विभागाचे प्रमुख तुषार कोतकर आदींचा समावेश होता.शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद,सचिव सचिन महाजन,खजिनदार जयेश बडवे,सहखजिनदार योगेश कुलकर्णी,संघटक महेंद्र कुलकर्णी,कार्यकारीणी सदस्य वसंतराव ठोबरे,संजीव देशपांडे,डाॕ.मिलिंद धारणगांवकर,अनिल कुलकर्णी,अॕड.सौ.श्रध्दा जवाद,अजिंक्य पदे,सदाशिव धारणगांवकर आदिनी विशेष परीश्रम घेतले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close