आरोग्य
अत्यावश्यक सेवा चोवीस तास धोकादायक-या नेत्याने दिला इशारा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य सरकारने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा चोवीस तास देण्याची घोषणा केल्याने या विषाणूंचा प्रसार होण्याचा धोका वाढला असल्याची व त्यावर राज्यसरकारने पुनर्विचार करण्याची गरज असल्याची मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
केंद्र व राज्य यांनी आतापर्यंत खंबीर पावले उचलली आहे मात्र संचार बंदी लागू करण्याचा मुख्य हेतू या मुळे बाजूला पडल्याचे दिसत आहे जो हा कोरोनाचा विषाणूंचा प्रसार करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण रस्त्यावर फिरताना पोलिसांची व प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहेत.कोपरंगाव नगरपरिषदेने या पूर्वी किराणा सामान तीन दिवस सकाळी १० ते दुपारी ४ तर या अत्यावश्यक सेवा आठवड्यातून तीन दिवस सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजे पर्यंत देण्याचा निर्णय केला होता तो गर्दी कमी होण्यासाठी नक्कीच निर्णायक होता.तशी नागरिकांची मानसिकता झाली होती.मात्र शासनाने पुन्हा दोन दिवसांपूर्वी असा निर्णय केल्याने जनतेची रस्त्यावरील वर्दळ धोकादायक पद्धतीने वाढली आहे.
भारतात आतापर्यंत ११९० लोकांना कोरोनोची लागण झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे नागरिक आपल्या गावाकडे जात आहेत. पण हे नागरिकच कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात. यामुळे सरकारने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काही दिवसात भारतातील गावं कोरोना व्हायरसची केंद्र बनतील असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.त्यातच दोन दिवसांपूर्वी नागरिकांच्या दुकासमोरील रांगा पाहून राज्य सरकारने दुकाने व अत्यावश्यक सेवा चोवीस तास देण्याचा निर्णय केल्याने त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे हि महत्वपूर्ण मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटलें आहे की,शासनाचा हेतू जनहिताचाच आहे त्यासाठी केंद्र व राज्य यांनी आतापर्यंत खंबीर पावले उचलली आहे मात्र संचार बंदी लागू करण्याचा मुख्य हेतू या मुळे बाजूला पडल्याचे दिसत आहे जो हा कोरोनाचा विषाणूंचा प्रसार करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण रस्त्यावर फिरताना पोलिसांची व प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहेत.कोपरंगाव नगरपरिषदेने या पूर्वी किराणा सामान तीन दिवस सकाळी १० ते दुपारी ४ तर या अत्यावश्यक सेवा आठवड्यातून तीन दिवस सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजे पर्यंत देण्याचा निर्णय केला होता तो गर्दी कमी होण्यासाठी नक्कीच निर्णायक होता.तशी नागरिकांची मानसिकता झाली होती.मात्र शासनाने पुन्हा दोन दिवसांपूर्वी असा निर्णय केल्याने जनतेची रस्त्यावरील वर्दळ धोकादायक पद्धतीने वाढली आहे.जी या विषाणूच्या प्रसारास सहाय्यभूत होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त करून शासनास सावध केले आहे व स्थानिक परिस्थिती पाहून हे निर्णय प्रांत,तहसीलदार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात यावे अशी मागणी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केली आहे.