जाहिरात-9423439946
आरोग्य

…या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गैरसोय थांबवा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुग्णांची व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय व हेळसांड होत असल्याचे निवेदन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी नुकतेच वैद्यकीय संचालक यांना दिले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

डायलिसिस विभागातील काही मशीन बंद असल्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना अनेक वेळा ताटकळत राहावे लागत आहे तर सोनोग्राफी विभागात सर्व सुविधा आहेत परंतु डॉक्टर उपलब्ध नसल्याने सोनोग्राफी विभाग बंद आहे.यामुळे माफक दरात उपलब्ध होणाऱ्या सुविधा खाजगी सोनोग्राफी सेंटरला करावी लागते किंवा सीटी स्कॅन करावा लागतो. परिणामी रुग्णांना आर्थिक फटक्या बरोबरच मोठ्या प्रमाणात हेळसांड व गैरसोय होत आहे.

वैद्यकीय संचालक यांच्या कार्यालयात दिलेल्या निवेदनात चौगुले यांनी म्हटले आहे की,”हॉस्पिटलमधील काही विभाग सुरळीत सुरू असून काही विभागातील अडचणींमुळे रुंगाना त्रासाला सामोर जावं लागत आहे.डायलिसिस विभागातील काही मशीन बंद असल्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना अनेक वेळा ताटकळत राहावे लागत आहे तर सोनोग्राफी विभागात सर्व सुविधा आहेत परंतु डॉक्टर उपलब्ध नसल्याने सोनोग्राफी विभाग बंद आहे.यामुळे माफक दरात उपलब्ध होणाऱ्या सुविधा खाजगी सोनोग्राफी सेंटरला करावी लागते किंवा सीटी स्कॅन करावा लागतो. परिणामी रुग्णांना आर्थिक फटक्या बरोबरच मोठ्या प्रमाणात हेळसांड व गैरसोय होत आहे.


हॉस्पिटलला सोनोग्राफी केल्यास ३५० रुपये लागतात तर खाजगी सेंटरला तीच रक्कम एक ते दीड हजार लागतात.हा आर्थिक फटका निष्कारण गरीब रुग्णांना सोसावा लागत आहे.या सुविधा तात्काळ सुरु कराव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा चौगुले यांनी शेवटी दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close