जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

…या मंडळाच्या वतीने महिलांसाठी योग शिबीर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

धावपळीच्या जीवनात कुटुंबातील माहिलांना आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे अनेक आजरांचा सामना करावा लागतो अशा व्याधींना दूर ठेवण्यासाठी नियमित योग साधना उत्तम पर्याय असून महिला भगिनींना योग साधनेचे प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या पुढाकारातून सोमवार दि.०९ ऑक्टोबर पासून कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे महिलांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

शारीरिक आजार दूर करण्यासाठी आणि माणसाचे शरीर आणि आत्मा सुखी राहण्यासाठी योगाचे महत्त्व आजही सांगण्यात येते. ‘युज’ या संस्कृत शब्दापासून योग हा शब्द बनला आहे.मन आणि आत्म्याला एकत्र जोडणे म्हणजे योग असे म्हटले जाते.सिंधु घाटामधून याची सुरूवात झाली असा इतिहास आहे.

शारीरिक आजार दूर करण्यासाठी आणि माणसाचे शरीर आणि आत्मा सुखी राहण्यासाठी योगाचे महत्त्व आजही सांगण्यात येते. ‘युज’ या संस्कृत शब्दापासून योग हा शब्द बनला आहे.मन आणि आत्म्याला एकत्र जोडणे म्हणजे योग असे म्हटले जाते.सिंधु घाटामधून याची सुरूवात झाली असा इतिहास आहे.त्याचे महत्व आजच्या आधुनिक काळात कमी झालेले नाही.त्यामुळे या शिबिराचा कोपरगाव शहर आणि तालुक्यातील महिलांना मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने या पूर्वी गोदाकाठ महोत्सव,नवरात्र महोत्सव,महिलांना विविध घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण असे अनेक उपक्रम राबवून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करीत असून यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

योग साधना ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे.योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे.नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते.शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते.वजन कमी असल्यास वाढण्यासदेखील मदत होते.त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते.नियमित योगामुळे मानवी जीवनात शारीरिक,मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते.याचा फायदा महिला भगिनींना होवून त्यांना देखील नियमित योग साधना करण्याची सवय होऊन त्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी दिली आहे.

दरम्यान या योग शिबिरात योग प्रशिक्षक डॉ.अभिजित शहा,वैभवी मखीजा योग साधनेचे धडे देणार असून या योग शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close