जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात…या बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबीर

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव पिपल्स बँक स्टाफ गणेशोत्सव मंडळ व कोपरगांव पिपल्स को-ऑप बँक लि.आणि आनंदऋषीजी हॉस्पीटल अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या.’अमृत महोत्सवी वर्षा’निमित्त रविवार नुकतेच कोपरगांव पिपल्स बँकेच्या विस्तारीत इमारतीमध्ये रक्तदान शिबीर मोठया उत्साहात पार पडले आहे.

“अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव,पॅलेसोमिया,रक्तक्षय,रक्ताचा कर्करोग,प्रसूतिपश्चात रक्तस्राव,शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते अशा प्रसंगी एका मानवाचे रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते”-कैलास ठोळे,अध्यक्ष,कोपरगाव पीपल्स कॉ.ऑप.बँक.

सदर रक्तदान शिबीरामध्ये बँकेचे सभासद,खातेदार,बँकेचे संचालक व कर्मचारी वर्गानी सहभाग घेऊन रक्तदान केले आहे.

या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे,संचालक अतुल काले,राजेंद्र शिंगी,कल्पेश शहा,दिपक पांडे,सुनिल बंब,सत्येन मुंदडा,हेमंत बोरावके,सुनिल बोरा,संजय भोकरे, संचालीका प्रतिभा शिलेदार,आणि बँकेचे उपमहाव्यवस्थापक जितेंद्र छाजेड व अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


या प्रसंगी आनंदऋषीजी हॉस्पीटल अ.नगर यांचे वतीने डॉ.सुनिल महानोर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यांचा बँकेच्या वतीने व स्टाफ गणेशोत्सव मंडळा तर्फे बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांचेहस्ते सत्कार करण्यात आला आहे.


  या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,”स्वतः जवळचं काहीतरी दिल्याचं समाधान म्हणजे रक्तदान आहे.तरी त्यांनी उपस्थितांना रक्तदान करण्यासाठी व त्यांचे ओळखीच्या व्यक्तींना रक्तदान शिबीरात भाग घेण्याचे आवाहन करून विनंती केली आहे.

रक्तदान शिबीर सांगता प्रसंगी आनंदऋषीजी हॉस्पीटल अ.नगरचे डॉक्टर सुनिल महानोर यांनी मनोगत व्यक्त करतांना आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीराचे कौतुक केले आहे.तर आपण राबिविलेल्या रक्तदान शिबीरामुळे व मिळालेल्या प्रतिसादामुळे कित्येक रुग्णांना जीवदान मिळणार आहे.

दरम्यान रक्तदान शिबीर पुर्ण झाल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर व्यास यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close