जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

…या रुग्णालयात पार पडली अवघड शस्रक्रिया ! वैद्यकीय चमूचे कौतुक

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

दि.११ जुलै रोजी संपुर्ण शस्रक्रिये दरम्‍यान रुग्‍णाला चक्‍क जागे ठेवुन मेंदुची गाठ काढण्‍यासाठी अवघड व गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलचे न्‍युरो सर्जन डॉ.मुकुंद चौधरी व त्‍यांच्‍या मेंदूतज्ञांच्या चमूने यशस्‍वीरित्‍या पार पाडली असुन या यशस्‍वी शस्‍त्रक्रियेबद्दल संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सर्व न्‍युरो सर्जरी चमूचे अभिनंदन केले आहे.

श्रीमती नंदा चंद्रकांत राजहंस (वय ६७)या जन्‍मतः अंध असलेल्‍या आजीच्‍या डाव्‍या हात व पायाची ताकद हळुहळु कमी होत असल्याचे निदान झाल्यावर शिर्डीत आणून त्यांना दि.११ जुलै २०२३ ला डॉ.निहार जोशी,वरिष्‍ठ भुलतज्ञ यांनी पेशंटच्‍या फक्‍त डोक्‍याच्‍या त्‍वचेला भुल दिली.पेशंटला इतर गुंगी येणारे औषध न देता,व्‍हेंटीलेटरवर न घेत,पुर्ण ऑपरेशन दरम्‍यान जागे ठेवण्‍यात आले डॉ. चौधरी यांनी मग साधारणतः दोन तासात ती गाठ पुर्ण काढुन टाकण्‍यात यश मिळवले.ऑपरेशन दरम्‍यान वारंवार डाव्‍या हाताची व पायाची ताकद तपासण्‍यात आली.अन त्‍यानुसार मेंदुमधील गाठ हळुहळु पुर्णतः काढण्‍यात आली आहे.वैद्यकीय पथकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्री साईबाबा संस्‍थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयात राज्‍याच्‍या कानाकोप-यातुन तसेच राज्‍याबाहेरील हजारो रुग्‍ण विविध उपचारांसाठी दाखल होत असतात.या रुग्‍णालयामध्‍ये मेंदु शल्‍य विभागात दर महिन्‍याला साधारणतः सरासरी ६० ते ७० मेंदु आणि मणक्‍याच्‍या शस्‍त्रक्रिया होतात.त्‍यातच पुणे जिल्‍हा शिरूर तालुक्‍यातील पाबळ येथील श्रीमती नंदा चंद्रकांत राजहंस (वय ६७)या जन्‍मतः अंध असलेल्‍या आजीच्‍या डाव्‍या हात व पायाची ताकद हळुहळु कमी होत असल्‍यांच नातेवाईकांच्‍या लक्षात आले.पुणे येथे तपास केले असता,रुग्णाला उजव्‍या मेंदुमध्‍ये गाठ असल्‍यांच निदान झाल होतं.त्यासाठी तज्ज्ञांनी शस्रक्रियेचा सल्‍लाही दिला होता.दरम्‍यान शस्र क्रियेदरम्यान डावा हात व पायाची ताकद पुर्ण जावु शकते व अर्धांगवायू होवु शकतो हे ऐकल्‍यावर मात्र नातेवाईकांची द्विधास्थिती झाली होती.आधीच पुर्णतः दृष्‍टीहीन आता अर्धांगवायूचा धोका,हा रुग्ण आणि नातेवाईक यांच्‍यासाठी मोठा धक्‍का होता.पुणे येथील खाजगी रुग्णालयाचा खर्च न पेलवणारा होता.चौकशी अंती त्यांना एका माहितीतील इसमाने त्यांना साईबाबा हॉस्पिटल न्‍युरोसर्जन डॉ.मुकुंद चौधरी यांना भेटण्‍याचा सल्‍ला दिला होता.

डॉ.मुकुंद चौधरी यांनी पुर्ण रुग्णाची स्थिती समजावुन घेतली.त्यावेळी रुग्ण म्हणाले की,’आपण यापूर्वीच,अंध आहे मला अजुन अपंग करु नका डॉक्‍टर ! अशी रुग्‍णाची भावनीक विनंती ऐकुण डॉ.चौधरी यांची जबाबदारी अजुन वाढली होती.साधारणतः चिकुच्‍या आकाराची ही गाठ नेमके मेंदुच्‍या अशा भागामध्‍ये होती,जिथुन शरीराच्‍या एका बाजुच्‍या ताकद नियंत्रीत करणा-या मुख्‍य नसांचा उगम होतो.त्‍यामुळे गाठ काढताना इतर भागाला धक्‍का लागल्‍यास, अर्धांगवायु होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नव्‍हती.यावर उपाय म्‍हणुन डॉ.मुकुंद चौधरी यांनी रुग्‍णाला भुल न देता ऑपरेशन करण्‍याचा कठीण निर्णय घेतला व वरिष्‍ठ भुलतज्ञ डॉक्‍टर निहार जोशी यांच्‍याशी चर्चा केली असता,त्‍यांनीही तयारी दर्शवली.शस्रक्रियेबाबत नातेवाईक अन रुग्‍ण यांना सविस्‍तर माहिती दिली गेली.खरं तर शस्रक्रिया म्‍हटलं की लोक घाबरतात मला आधी भुल द्या,काही समजु देवु नका असं सांगतात,अन हे तर मेुंदुची शस्रक्रिया होती.अन तरीही सरतेशेवटी डॉ.चौधरी मात्र पुर्ण भुल न देता जागे ठेवुनच शस्रक्रिया करु म्‍हटल्‍यावर आजी जरा बुचकळयात पडल्‍या.पण रुग्‍णाच सहकार्य महत्‍वाच होत कुठली ही हालचाल न करता,साधारण पणे दोन अडीच तास ऑपरेशनला सामोरे जायचे होते.डॉ.चौधरी यांनी रुग्‍णाला विश्‍वासात घेवुन जागे असताना शस्रक्रिया केले तर हात व पायाची ताकद जाण्‍याचा धोका टळला जावु शकतो.हे समजून सांगितले असता,मग मात्र आजीही तयार झाल्‍या अन रुग्‍णाला पुर्णभुल न देता जागेपणीच ऑपरेशन चा निर्णय पक्‍का केला होता.

दि.११ जुलै २०२३ ला डॉ.निहार जोशी,वरिष्‍ठ भुलतज्ञ यांनी पेशंटच्‍या फक्‍त डोक्‍याच्‍या त्‍वचेला भुल दिली.पेशंटला इतर गुंगी येणारे औषध न देता,व्‍हेंटीलेटरवर न घेत,पुर्ण ऑपरेशन दरम्‍यान जागे ठेवण्‍यात आले डॉ. चौधरी यांनी मग साधारणतः दोन तासात ती गाठ पुर्ण काढुन टाकण्‍यात यश मिळवले.ऑपरेशन दरम्‍यान वारंवार डाव्‍या हाताची व पायाची ताकद तपासण्‍यात आली.अन त्‍यानुसार मेंदुमधील गाठ हळुहळु पुर्णतः काढण्‍यात आली.ऑपेरशन नंतर ही रुग्‍ण व्‍यवस्‍थीत असुन,मुख्‍य म्‍हणजे डाव्‍या बाजुच्‍या हात व पायाची ताकद कमी झाली नाही आणि अर्धांगवायुचा धोका टळला होता हे विशेष !

दरम्यान अशी अवघड अन वेगळी शस्‍त्रक्रिया यशस्‍वी पार पाडल्‍याबद्दल पुर्ण मेंदू तज्ज्ञांच्या चमूचे श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी,पी.शिवा शंकर,उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी,राहुल जाधव,श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ. शैलेश ओक (से.नि),उपवैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे व हॉस्पिटल जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी अभिनंदन केले आहे.हि संपुर्ण शस्रक्रिया शासनाच्‍या महात्‍मा ज्‍योतीराव फुले जन आरोग्‍य योजने अंतर्गत पुर्णपणे मोफत पार पडल्‍यामुळे नातेवाईकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे आणि डॉ.मुकुंद चौधरी,डॉ.निहार जोशी व पुर्ण मेंदू शस्रक्रिया विभागाचे आभार मानले आहे.यापूर्वी पाच महिन्‍यापासुन मेंदुमध्‍ये रुतलेला दगड काढण्‍याची अशा प्रकारची गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया डॉ.मुकुंद चौधरी व त्‍यांचे टिमने यशस्‍वीरित्‍या पार पाडलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close