कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात…या प्रवेशद्वाराचे उद्घाटन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीचे निमित्त आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले आहे.
सहकार क्षेत्रातील अध्वर्यू,काँग्रेसचे माजी खासदार आणि कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक शंकरराव काळे यांचे मुंबईत सन-२०१२ साली वृद्धापकाळाने निधन झाले होते.त्यांनी शरद पवारांच्या पुलोद आघाडीत ते शिक्षण व सहकार या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले होते.महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर १९६२ ते ७२ अशी सलग दहा वर्षे अ.नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले होते.त्यांच्या जयंती निमित्ताने आज प्रवेशद्वाराचे आज आ.आशुतोष काळे यांनी उदघाटन केले आहे.
माजी खा.काळे यांनी रयत शिक्षण संस्थेत १५ वर्षे तर कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे ३५ वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.ते भगवान दत्त गुरु यांचे परम भक्त होते.त्यांनी आपल्या कालखंडात आपल्या माहेगाव देशमुख ययेथे दत्त गुरु यांचे भव्य मंदिराची निर्मिती केली होती.त्याच ठिकाणी आ.आशुतोष काळे यांनी प्रवेशद्वार निर्माण केले आहे व त्याचे आज त्यांच्या जयंती निमित्ताने उदघाटन केले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे यांची जन्मभूमी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील श्री दत्त व श्री मारुती देवस्थान ट्रस्ट व श्री अमृतेश्वर देवस्थान ट्रस्ट चे कर्मवीर शंकररावजी काळे संस्थापक आहेत.त्यांच्या स्मरणार्थ या ट्रस्टच्या वतीने माहेगाव देशमुख येथे माहेगाव देशमुख-मळेगाव थडी रोडवर भव्य प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे.
सदर प्रसंगी माहेगाव देशमुख येथील सरपंच सुमनताई रोकडे,उपसरपंच भास्करराव काळे,माहेगाव देशमुख सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय काळे,श्री अमृतेश्वर देवस्थान व श्री दत्त व मारुती देवस्थानचे विश्वस्त,सोसायटीचे संचालक,ग्रामपंचायत सदस्य व माहेगाव देशमुख ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.