महसूल विभाग
…या तालुक्यातील २५ तलाठी कार्यालय इमारतींसाठी ५.३३ कोटीचा निधी-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव तालुक्यातील जुन्या तलाठी कार्यालयांच्या नुतनीकरणाचा व काही तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून २०२२/२३ च्या अर्थसंकल्पात कोपरगाव तालुक्यातील २५ तलाठी कार्याल ०५ कोटी ३३ लाख २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे,धोत्रे,काकडी,पोहेगाव,वारी,चास नळी,शिंगणापूर,संवत्सर,मंजूर, कोकमठाण,मढी बु.,चांदेकसारे,पढेगाव,ब्राम्हणगाव,धारणगाव,करंजी,येसगाव,तिळवणी,गोधेगाव,धामोरी,वेस, मळेगाव थडी,रांजणगाव देशमुख,जेऊर कुंभारी व कुंभारी या गावातील तलाठी कार्यालयांचा समावेश असला तरी सात गावात मध्यवर्ती असताना जवळके येथील तलाठी कार्यालय अद्याप बेवारस ठरले आहे.त्याला कधी मुहूर्त लाभणार असा असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.
तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे.जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो.गावातील शेत जमिनीचा सात बारा,आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.त्यांना इमारती महत्वाच्या असून नजीकच्या तालुक्यात याकधीच पूर्ण करण्यात आल्या आहेत मात्र कोपरगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती आणि तलाठी कार्यालये हि बेवारस ठरली होती.त्यामुळे त्या कार्यालयातील दप्तरी हे राम भरोसे होते म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्या प्रश्नाकडे प्रथमच आ.आशुतोष काळे यांनी लक्ष केंद्रित केले आहे हे विशेष !
त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तलाठी कार्यालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती.तेव्हापासून आ.आशुतोष काळे या तलाठी कार्यालयांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध होवून काम सुरु व्हावे यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून २५ तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी ५ कोटी ३३ लाख २० हजार रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
यामध्ये कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे,धोत्रे,काकडी,पोहेगाव,वारी,चास नळी,शिंगणापूर,संवत्सर,मंजूर, कोकमठाण,मढी बु.,चांदेकसारे,पढेगाव,ब्राम्हणगाव,धारणगाव,करंजी,येसगाव,तिळवणी,गोधेगाव,धामोरी,वेस, मळेगाव थडी,रांजणगाव देशमुख,जेऊर कुंभारी व कुंभारी या गावातील तलाठी कार्यालयांचा समावेश असला तरी सात गावात मध्यवर्ती असताना जवळके येथील तलाठी कार्यालय अद्याप बेवारस ठरले आहे.त्याला कधी मुहूर्त लाभणार असा असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.