जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले-…यांची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सर्व समाजाला समसमान न्याय देतांना अल्पसंख्याक समाजाला देखील विकासाच्या बाबतीत समान न्याय दिला असून अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न,समस्या,अडचणी सोडवून अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कोपरगाव शहरातील सर्व समाजाच्या समाज मंदिराबरोबरच सुतार-लोहार समाजाच्या मागणीवरून समाज मंदिरासाठी निधी दिला आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील युवा वर्गाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या प्रगतीमधील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

वैशिष्ट्यपुर्ण ठोक अनुदान योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील सुतार-लोहार समाजाच्या समाजमंदिर कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी सुतार लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव,उपाध्यक्ष वामन कदम,सचिव दत्तात्रय क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,रमेश गवळी,फकीर कुरेशी,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,चंद्रशेखर म्हस्के,संदीप कपिले, अंबादास वडांगळे,राजेंद्र खैरनार आदींसह नागरिक उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील प्रत्येक जाती धर्माचे,पंथाच्या नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडविणे ही आपली जबाबदारी आहे.कोपरगाव शहरातील सर्व समाजाच्या समाज मंदिराबरोबरच सुतार-लोहार समाजाच्या मागणीवरून समाज मंदिरासाठी निधी दिला आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील युवा वर्गाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या प्रगतीमधील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.अल्पसंख्याक समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करून त्यांना शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सोई सवलती व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करून त्यांचा विकासाच्या मुख्य प्रवाहातील अधिकचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आ. काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close