कोपरगाव तालुका
कोपरगावकरांचे मिळालेले प्रेम आगामी काळात नक्कीच उपयुक्त ठरेल-पोलीस निरीक्षक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पोलिसांत काम करताना आपल्या सहकाऱ्यांचे व कोपरगाव करांचे मिळालेले प्रेम आगामी काळात नक्कीच उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक जिल्हा ग्रामीण माधव नुकतीच बदली झाली असून त्यांचा निरोप समारंभ आज सायंकाळी ०८ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस पाटील संघटनेचे संपर्क प्रमुख संजय वाबळे हे होते.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,चासनळीचे माजी सरपंच सचिन चांदगुडे,चांदेकसारे येथील माजी उपसरपंच केशव होन,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे माजी संचालक डॉ.गोरक्षनाथ रोकडे,चांदेकसारे सरपंच किरण होन,बाजार समितीचे माजी संचालक भिवराव दहे,आर.पी.आयचे उत्तर विभाग प्रमुख दीपक गायकवाड,हिरालाल महानुभाव,स्वच्छता दूत सुशांत घोडके,कल्याण होन आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”मी आयुष्यात पोलीस अधिकारी होईल असे वाटले नव्हते,पण या क्षेत्रात आलो पण या क्षेत्रातील अनुभव नक्कीच आगामी काळात उपयुक्त होईल.आपल्याला कोपरगाव येथे असताना तरुण वयात पोलिसांचा विलक्षण अनुभव आला होता.पोलिसांची जनसामान्यावर असलेली भीती अनुभवयास मिळाली होती.मात्र पोलीस अधिकारी होईल असे वाटले नव्हते.व्यायामाचा छंद हा लहानपासून होता.जवळचे नातेवाईक पोलीस आणि लष्करात जाण्यास प्रोत्साहन देत असून त्यातून या क्षेत्रात आलो असून आपल्याला दिशा मिळाली आहे.मला आल्यावर कोपरगावात नागरिकांनी मोठे सहकार्य लाभले होते.आपण ज्या ठिकाणी काम केले ते चांगले की वाईट ही त्याची पावती आजची उपस्थिती आहे.
सदर प्रसंगी सुरेश आव्हाड यांनी पोलीस निरीक्षक जाधव हे त्यांच्या कार्याने कायम आमच्या बरोबर राहणार आहे.त्यांच्या कामाची प्रेरणा कायम आम्हाला दिशा देईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक शेळके यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन सचिन चांदगुडे,केशव होन,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,दीपक गायकवाड,आदींनी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या कामाचे अनुभव सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर प्रसंगी समारोपाच्या वेळी पोलीस पाटील संघटनेने पोलीस निरीक्षक जाधव यांच्या समोर पुष्पवृष्टी करून त्यांना भावपुर्ण निरोप दिला असल्याची माहिती पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी संजय वाबळे यांनी दिली आहे.असे भाग्य व जनतेचे प्रेम फार थोड्या अधिकाऱ्यांच्या वाटेला येत असल्याचे तालुक्यात मानले जात आहे.
सदर प्रसंगी उपस्थितांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचा सत्कार केला आहे.सूत्रसंचालन लक्ष्मण जावळे यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक धाकराव यांनी मानले आहे.