कोपरगाव तालुका
मार्च नंतर राज्यात पुन्हा हवामान खराब होणार-…या हवामान तज्ज्ञांचे भाकीत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी काळात फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडी राहणार असून मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढणार असून हवामान कोरडे राहणार आहे मात्र ५ मार्च नंतर राज्यात पुन्हा हवामान खराब होणार आहे.५ तारखेनंतर विदर्भ व पूर्व विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज असून त्याची काही अंशी झळ बसण्याची शक्यता असून काढणीला आलेला गहू, हरबरा लवकरात लवकर काढून घ्या असे आवाहन प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी आज सुरेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“कोपरगाव तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या सुरेगावच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांना शुद्ध व नियमित पाणी मिळावे यासाठी १९ कोटी रुपये निधी देवून त्या गावाचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे सांगून त्यांनी,”ग्रामपंचायतीचा वाढदिवस साजरा करून गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या आजी माजी सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्याची संकल्पना स्वागतार्ह आहे”-आ.आशुतोष काळे,सुरेगाव.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हि तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत मानली जाते.त्या ठिकाणी सरपंच शशिकांत वाबळे यांनी तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजपयोगी योजना राबवल्या जात आहेत.याच सुरेगाव ग्रामपंचायतीचा आज २४ फेब्रुवारी रोजी ‘६५ वा वर्धापन दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यानिमित्त प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.त्यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
सदर प्रसंगी श्री गोवर्धनगिरी महाराज,जिल्हा उद्योग अधिकारी अतुल दवंगे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वाल्मिक कोळपे,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब,गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे,शरद पवार पतसंस्थेचे संचालक सुदामराव वाबळे,बन्सी निकम,ज्ञानेश्वर हाळनोर,कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सिकंदर पटेल,दगु गोरे,मोहन वाबळे,पंढरीनाथ जाधव,रणजित वाबळे,पांडुरंग ढोमसे,भाऊसाहेब कदम,राजेंद्र निकम,जगन्नाथ गोरे,नवनाथ गोरे,कैलास कदम,सुहास वाबळे,पं.स.विस्तार अधिकारी तोरणे,रविंद्र देवकर,अंबादास धनगर,शहाजापुरचे सरपंच सचिन वाबळे,मढीचे सरपंच प्रविण निंबाळकर,राहुल जगधने,प्रथम लोकनियुक्त सरपंच शशिकांत वाबळे,उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर,ग्रामविकास अधिकारी दिगंबर बनकर आदिसंह सर्व सदस्य आजी माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,कोपरगाव,सिन्नर तालुक्यातील शेतकरी विविध क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मागील काही दिवसांपासून वृत्तपत्रात २०२३ दुष्काळ पडणार असल्याच्या बातम्या येत आहेत.मात्र शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही मागील वर्षीप्रमाणेच २०२३ ला देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे सूतोवाच करून त्यांनी एल-निनो व ला-निनो हे स्पॅनिष भाषेतील शब्द आहेत.एल-निनो चक्रीवादळ तयार झाल्यास दुष्काळ पडतो व ला-निनो चक्रीवादळ तयार झाल्यास मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.त्याच बरोबर मुंबईकडून जर पाऊस आला तर त्यावर्षी नगर जिल्ह्यात पाऊस कमी होतो व जर हाच पाऊस पूर्वेकडून आला तर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाऊस होतो.त्यामुळे अ.नगर जिल्ह्यातील सर्वांनी वरून राजाला पूर्वेकडून येण्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन केले आहे.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी बोलताना म्हटले आहे की,”कोपरगाव तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या सुरेगावच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांना शुद्ध व नियमित पाणी मिळावे यासाठी १९ कोटी रुपये निधी देवून त्या गावाचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे सांगून त्यांनी,”ग्रामपंचायतीचा वाढदिवस साजरा करून गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या आजी माजी सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्याची संकल्पना स्वागतार्ह आहे.त्यामुळे निश्चितपणे गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांना प्रेरणा मिळून सुरेगावचा सर्वांग विकास होवून सुरेगाव ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर जाईल असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.
सदर पसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच शशिकांत वाबळे यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत सद्स्य अरुण लोंढे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार ग्रामविकास अधिकारी दिगंबर बनकर यांनी मानले आहे.