जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नगर नामांतर रथयात्रा आगामी १३ फेब्रुवारी रोजी…या तालुक्यात येणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर रथयात्रा आगामी १३ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातुन जाणार असल्याची माहिती नामांतर समितीचे जिल्हा समन्वयक विजय तमनर यांनीं दिली आहे.

सदर यात्रा अ.नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन ही रथयात्रा जाणार असुन तळेगाव मार्गे या रथयात्रेचे आगमन कोपरगाव तालुक्यात दि.१३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.या रथयात्रेतील मुख्य कार्यक्रम सकाळी ९ वाजता कोळपेवाडी येथे तर दुपारी १२ वाजता कोपरगाव येथे होणार असुन दरम्यान च्या प्रवासात विविध गावे स्वागत,मोटार सायकल फेरी व विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण,”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावे” यासाठी समाजातील सर्व स्तरातून मागणी होत असून या पार्श्वभूमीवर जागृती निर्माण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या चोंडी ते जिल्हाधिकारी कार्यालय,नगर शहर ही रथयात्रा काढण्यात येणार आहे.

सदर यात्रा अ.नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन ही रथयात्रा जाणार असुन तळेगाव मार्गे या रथयात्रेचे आगमन कोपरगाव तालुक्यात दि.१३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.या रथयात्रेतील मुख्य कार्यक्रम सकाळी ९ वाजता कोळपेवाडी येथे तर दुपारी १२ वाजता कोपरगाव येथे होणार असुन दरम्यान च्या प्रवासात विविध गावे स्वागत,मोटार सायकल फेरी व विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

कोपरगाव तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे ठराव व मागणीपत्रे समितीकडे देण्यात येणार आहेत.नियोजन बैठकीवेळी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर,संजय वडीतके तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षत्रिय धनगर समाज सेवा संघ अध्यक्ष भाऊसाहेब दादा शेळके,अशोक घोलप,रमेश टिक्कल,किरण थोरात,संतोष चोपडे,विजय हाळनोर,माजी सरपंच सचिन कोळपे,राजेंद्र नावाडकर,विठ्ठल मैंदड आदिंसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रथयात्रेत कोपरगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभागी होण्याचे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षत्रिय धनगर समाज सेवा संघ यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close