कोपरगाव तालुका
कोपरगावात उद्या विधी जागृती आणि प्रचार अभियानाचा सांगता समारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय विधी जागृती आणि प्रचार समिती व तत्सम विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सराफ बाजार येथील ‘अहिर सुवर्णकार भवन’ या ठिकाणी अखिल भारतीय विधी जागृती आणि प्रचार अभियानाचा सांगता समारंभ जिल्हा न्या. न्यायाधीश स.बा.कोऱ्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न होत असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी केले आहे.
“अखिल भारतीय विधी जागृती आणि प्रचार अभियान दि.३१ ऑक्टोबर पासून दि.१२ नोव्हेंबर पर्यंत विविध संघटनांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्याला कोपरगाव वकील संघ व कोपरगाव तालुका विधी समिती,कोपरगाव पंचायत समिती,तहसील कार्यालय,तालुक्यातील विविध संघटना यांचे मोठे सहकार लाभले आहे”- न्या.भगवान पंडित,अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी,कोपरगाव न्यायालय.
भारतीय विधी जागृती आणि प्रचार समिती छत्रपती शिवाजी रोड व व्यापारी संघटना,प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ,मुंबादेवी तरुण मंडळ,सराफ सुवर्णकार असोसिएशन आणि प्रभाग क्रं.६ मधील सर्व रहिवासी आदींच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय विधी जागृती आणि प्रचार अभियान दि.३१ ऑक्टोबर पासून दि.१२ नोव्हेंबर पर्यंत तालुक्यातील विविध गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्याला कोपरगाव वकील संघ व कोपरगाव तालुका विधी समिती,कोपरगाव पंचायत समिती,तहसील कार्यालय,तालुक्यातील विविध संघटना यांचे मोठे सहकार लाभले असल्याची माहिती न्या.भगवान पंडित यांनी आज दुपारी चार वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.त्याचा सांगता समारंभ दि.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महालक्ष्मी मंदिर अहिर सुवर्णकार भवन सराफ बाजार येथे संपन्न होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी साहाय्य समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश स.बा.कोऱ्हाळे हे राहणार आहे.
सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश क्रं.२ बी.एम.पाटील,तहसीलदार विजय बोरुडे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,अतिरिक्त जिल्हा अभीयोक्ता ए.एल.वहाडणे,वकील संघाचे अध्यक्ष एस.पी.खामकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तर प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग श्रीमती एस.एम.बनसोड, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए.शिलार,सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.एस.बोस,एस.बी.देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.दरम्यान या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन न्या.भगवान पंडित यांनी शेवटी केले आहे.