जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव येथील…या बांधकाम अभियंत्यांची बदली

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव येथील सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांची नुकतीच कर्जत येथे बदली झाली आहे.त्यांच्या जागी राजूर येथील उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्री शिंदे हे हजर झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

“आपल्या कार्यकाळात आपल्याला राजकीय नेते,अधिकारी,कर्मचारी,सहकारी आदिकडून खूप शिकायला मिळाले.तालुक्यातील जनतेबरोबर काम करत असताना चार वर्षे कसे झाले समजलेच नाही.गेल्या चार वर्षांच्या काळात सर्वांचा मिळालेला सहवास,प्रेम,आपुलकी,आदर कायम आठवणीत राहील”-प्रशांत वाकचौरे,मावळते सहाय्यक अभियंता,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव.

सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे हे ४ जुलै २०१८ मध्ये जळगाव जिल्ह्यातील बोधवड येथे त्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर,जळगाव येथुन बदली होऊन कोपरगाव येथे हजर झाले होते.त्यांनी कोपरगाव तालुक्यात सेवेची ४ वर्षे ३ महिने पूर्ण केल्यानंतर १२ऑक्टोबर रोजी त्यांची बदली कर्जत जि.अ.नगर येथे झाली आहे.त्यांच्या काळात कोपरगाव येथील तालुका न्यायालयाची इमारत मंजूर झाली आहे.या खेरीज त्यांच्या काळात कोपरगाव तालुक्यातील नाबार्ड अंतर्गत रवंदे,येसगाव,शिंगणापूर,शिंगवे,कोकमठाण,आदी पूलांची कामे पूर्णत्वास गेली आहे.

या शिवाय नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत गोकुळनगरी,कोळपेवाडी,ब्राम्हण नाला,कोळनदी,पढेगाव,वाकडी,शिंगवे,ब्राम्हणगाव,आदी नऊ पुलाची कामे पूर्ण झाली आहे.या शिवाय अर्थसंकल्पीय,नाबार्ड,सी.आर.एफ.आदी कामे प्रगती पथावर आहेत.या शिवाय न्यायालयीन इमारत,न्यायाधीश निवासस्थाने,उपजिल्हा रुग्णालय,वारी पुलाचे काम अंदाजपत्रकीय स्तरावर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.मात्र त्यांच्या कार्यकाळातही नादुरुस्त रस्त्यांची ओरड जनतेत कायम राहिली त्यात तळेगाव मार्गे कोपरगाव-संगमनेर,सावळीविहोर मार्गे रांजणगाव देशमुख-बहादरपूर,कोपरगाव-वैजापूर रस्त्यावरील पढेगाव जवळील रस्ता आदिंचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close