कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील…या वर्ग खोल्या बांधण्यासाठी साठ लाख देणार-आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पोहेगाव येथील श्री ग.र.औताडे विद्यालयातील सर्वच विद्यार्थी एकाच वेळी शिक्षण घेवू शकतील त्यासाठी नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ६० लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी पोहेगाव येथे बोलताना दिले आहे.
“कर्मवीर भाऊराव पाटील व कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षण प्रसाराचे काम आ.काळे चांगल्या पद्धतीने करीत आहेत.त्यांच्या रूपाने जबाबदार,उच्च विद्याविभूषित नेतृत्व रयत शिक्षण संस्थेला लाभले आहे”-प्रा.उज्जलाताई भोर.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.ग.र.औताडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभुषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आपले अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे,वसंतराव आभाळे,राहुल रोहमारे,अशोक रोहमारे,एम.टी.रोहमारे,सुनील शिंदे,काकासाहेब जावळे,नंदकिशोर औताडे,के.डी.खालकर,मधुकर औताडे,दिलीप औताडे,उत्तम औताडे,निवृत्ती शिंदे,वाल्मिक नवले,अनिल वर्पे,राजेंद्र पाचोरे,भाऊसाहेब सोनवणे,जयंत रोहमारे,योगेश औताडे,बाळासाहेब औताडे,काकासाहेब गवळी,विद्यालयाचे प्राचार्य एस.के.शिंदे,श्री कुरकुटे सर,छत्रपती संभाजी विद्यालय गौतमनगरचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदींसह शिक्षक,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलता ते म्हणाले की,”पद्मभुषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वाड्या वस्त्यावर, बहुजनांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविली.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने कर्मवीर शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी तन-मन धनाने प्रयत्न करून रयत शिक्षण संस्थेचे राज्यासह जिल्ह्यात जाळे विणून कष्टकरी,शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.हाच वारसा पुढे चालवितांना खा.शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची आपल्याला जबाबदारी दिली आहे.दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण देखील कर्मवीरांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून तनमनधनाने रयत शिक्षण संस्थेच्या भरभराटीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.पोहेगाव व परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी श्री.ग. र. औताडे विद्यालयाचे काम समाधानकारक असून विद्यालयाला सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन त्यानी शेवटी दिले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी शालेय विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे आ.काळे यांनी विशेष कौतुक केले.त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.ग.र.औताडे विद्यालयात प्रयोगशाळा वाढल्यामुळे वर्ग खोल्या कमी पडत आहेत.विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना येत असलेल्या अडचणी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे.