कोपरगाव तालुका
कोपरगावात पालिकेत हरकती नोंदविण्याची मुदत वाढविण्याची गरज-..या नेत्याचे मत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी सध्या घरोघर जाऊन घरपट्टी वसुलीच्या नोटिसांचे (११९) वाटप करत आहेत.त्या नोटीसमध्ये दि.३ ऑक्टोबर पर्यंत हरकती नोंदविता येतील असा उल्लेख आहे.आता पर्यंत फक्त ५० टक्के करदात्यांपर्यंतच या नोटीसा पोहोचलेल्या आहेत.त्यामुळे हरकती नोंदविण्याची मुदत वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवरे केले आहे.
“शासकिय नियमानुसार दर पाच वर्षांनी किती टक्के वाढ करता येते याचा विचार करणे गरजेचे आहे.शहरातील अशिक्षित,हातावर पोट भरणारे कित्येक जणांना उशिरा नोटिसा पोहचल्यास घाईघाईने हरकती नोंदविणे अवघड जाईल.कुठल्याही परिस्थितीत अवाजवी करवाढ मान्य केली जाणार नाही.नागरिकांनीही लवकरात लवकर कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात आपल्या हरकती नोंदवाव्यात”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव नगरपरिषदेने नुकत्याच महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ चे कलम ११९(१)(२) अन्वये मालमत्ता कराच्या वाढीव दराने नोटिसा काढल्या आहेत.त्यात सन-२०२२-२३ ते २०२६-२७ असा कालावधी दर्शवला आहे.करयोग्य क्षेत्रफळ,करयोग्य मूल्य,संकलित कर,विशेष शिक्षण कर,अग्निशामक कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,वृक्ष कर,असे अवाजवी कर लावल्याचा नागरिकांचा आरोप आहे.त्या नोटीसीत नावात काही बदल,चूक,कोणतीही हरकत असल्यास पालिका मुख्याधिकारी यांना लेखी स्वरूपात कळविण्यास सांगितले आहे.व त्यासाठी अखेरची मुदत ३ ऑक्टोबर २०२२ अशी दिली आहे.त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना साथीने दोन वर्ष नागरिकांचे कंबरडे आधीच मोडले असतांना पालिकेने हा तुघलकी निर्णय घेतला आहे तो नागरिकांना पचनी पडलेला नाही.त्यामुळे आधीच निष्ठावान भाजपचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादीने आधीच आवाज उठवला असताना आज पुन्हा यावर आपले मत व्यक्त केले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटलं आहे की,”शासकिय नियमानुसार दर पाच वर्षांनी किती टक्के वाढ करता येते याचा विचार करणे गरजेचे आहे.शहरातील अशिक्षित,हातावर पोट भरणारे कित्येक जणांना उशिरा नोटिसा पोहचल्यास घाईघाईने हरकती नोंदविणे अवघड जाईल.कुठल्याही परिस्थितीत अवाजवी करवाढ मान्य केली जाणार नाही.नागरिकांनीही लवकरात लवकर कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात आपल्या हरकती नोंदवाव्यात.घरपट्टी कमी व्हावी यासाठी कितीही प्रखर आंदोलन करावे लागले तरी ते करण्यात येईल असा इशाराही माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी दिला आहे.